धक्कादायक धामणगाव रेल्वे

बऱ्हाणपूर घटनेची पुनरावृत्ती ; गोकुळसरा शिवारातील तुरीच्या गंजीला लावली आग, ३ लाखांचे नुकसान

शेतकरी संतोष लोखंडे यांच्या शेतातील ४५० तुरीच्या गंजीची राखरांगोळी

धमगणाव रेल्वे

तालुक्यात गेल्या दोन दिवसात वेगवेगळ्या ठिकाणी शेतात लावलेल्या तुरीच्या गंजीला आग लावून पिकांची राखरांगोळी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे संपूर्ण तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नुकत्याच चिंचपूर येथील शेतकरी गजानन वाणी यांच्या ६ एकर शेतातील ५५० तुरीच्या पेंड्या आरोपी यांनी आग लावून पेटवून दिल्या होत्या. त्याप्रकरणी आशिष जगताप यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. ती लावलेली आग पूर्णपणे शांत होत नाही तर गोकुळसरा येथील शेतकरी संतोष लोखंडे यांच्या शेतातील सुद्धा तुरीच्या गंजीला आग लावून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना दि. ०२ फेब्रुवारी सायंकाळी ६ ते ७ च्या सुमारास उघडकीस आली आहे. ज्यामध्ये शेतात लावून ठेवलेल्या एकूण ४५० पेंड्याची राखरांगोळी झाली. त्यामुळे शेतकरी संतोष लोखंडे यांचे अंदाजे ३ लक्ष रुपयांचे नुकसान झाले आहे. सदर घटनेची पोलीस स्टेशन मंगरूळ द. येथे तक्रार दाखल करण्यात आली असून आरोपी अनिल मडावी वय – ३५ वर्ष रा. गोकुळसरा यांच्याविरुद्ध बीएनएस कलम ३२६ एफ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

जुन्या वादातून आरोपीने नुकसान केल्याचा आरोप

शेतकरी संतोष लोखंडे यांनी दिलेल्या पोलीस तक्रारीवरून आरोपी अनिल मडावी यांच्यासोबत पूर्वी झालेल्या वादामुळे त्याने अनेकदा तुझे मोठे नुकसान करेन अशी धमकी दिली होती. तसेच घटनेच्या दिवशी एका शेतकऱ्याला आरोपी संतोष लोखंडेच्या शेताकडे जाताना दिसल्याचे तक्रारीत नमूद आहे. एकीकडे शेतीसाठी कर्जबाजारी होऊन शेतात पीक लावले होते त्या पिकातून कर्ज फेडू असे ठरवले असताना एका दिवसातच होत्याच नव्हतं झाल्याने माझ्या परिवारावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला असल्याचे मत संतोष लोखंडे यांनी व्यक्त केले. याप्रकरणी मंगरूळ दस्तगीर पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला असून अधिक तपास सुरु आहे.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!