धामणगाव रेल्वे शैक्षणिक

भर पावसातही गंगाजळीतील विद्यार्थ्यांची ” हर घर तिरंगा ” जनजागृती

धामणगाव रेल्वे –

शासन निर्णयानुसार हर घर तिरंगा – २०२५ उपक्रमांतर्गत २ ऑगस्ट पासून १५ ऑगस्ट पर्यंत ३ टप्यापमध्ये शालेय स्तरावर विविध उपक्रम राबविण्यात आले. त्यामध्ये कार्यशाळा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, प्रभातफेरी, जनजागृती, ध्वजारोहण इत्यादींचा समावेश आहे. त्याचाच भाग म्हणून आज दिनांक १३ ऑगस्ट रोजी सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरु झालेली असताना देखील भर पावसामध्ये गंगाजळीतील विध्यार्थ्यानी ध्वजारोहण करीत गावात प्रभातफेरी काढून हर घर तिरंगा ची जनजागृती केली. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांसह पालक वर्ग सुद्धा उपस्थित होता.

शाळेची विध्यार्थी संख्या कमी असली तरी देशाप्रतीअसलेले प्रेम दाखवण्यासाठी विध्यार्थी कुठेच कमी पडत नसल्याचे चित्र या निम्मिताने आज दिसून आले. सकाळपासूनच पावसाने हजेरी लावली असताना पावसामध्येच झेंडावंदन करीत गावात प्रभात फेरी मार्फत हर घर तिरंगा लावण्यासाठी जनजागृती करण्यात आली.

कु. धनश्री रवि वानखडे हिने काढलेले चित्र…. 

सर्वप्रथम शाळेतील मुख्यध्यापक डी. जे. राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रगीत म्हणून विविध कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. विध्यार्थ्यानी सुद्धा भारत माता कि जय, हर घर तिरंगा, घर घर तिरंगा च्या घोषणा देत गावात प्रभात फेरी काढली. यावेळी मुख्यध्यापक डी. जे. राठोड सह मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी सुरज वानखडे, पोलीस पाटील सौ. भारती नरेश गावंडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ. सारिका रवि वानखडे, आशा सेविका सौ. शांता निरंजन मोहोड, पालक वर्गामधून सौ. सोनू सिद्धार्थ नाईक, सौ. चंचल निलेश इंगोले प्रामुख्याने उपस्थित होते..
मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!