धामणगाव रेल्वे शैक्षणिक

कला शिक्षक अजय जिरापुरे यांनी आपल्या कलेतून साकारले “लोकराजा” राजश्री शाहू महाराजांचे चित्र

धामणगाव रेल्वे

राजश्री शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षणप्रसार करण्यावर विशेष भर दिला. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी इ.स. १९१९ साली सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत बंद केली. जातिभेद दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. इ.स. १९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली..
१८९६चा दुष्काळ व नंतर आलेली प्लेगची साथ या काळात त्यांची कसोटी लागली आणि त्याला ते पूर्णपणे उतरले. दुष्काळी कामे, तगाईवाटप, स्वस्त धान्यदुकाने, निराधार आश्रमाची स्थापना हे कार्य पाहता ‘असा राजा होणे नाही’ असेच प्रजेला वाटते..
आज दिनांक- २६ जून राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त से.फ.ला.हायस्कूल,धामणगाव- रेल्वे जिल्हा -अमरावतीचे कला शिक्षक -चित्रकार अजय जिरापुरे यांनी विदयालयाच्या दर्शनी फालकावर ” लोकराजा ” यांचे चित्र रेखाटन करून विनम्र अभिवादन केले आहे
मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!