धामणगाव रेल्वे शैक्षणिक

धामणगाव तालुक्यात गुलाबपुष्पांनी स्वागत, नवाकोरा गणवेश अन् पुस्तके -विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

तहसीलदार, गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी पोहोचले शाळेत

धामणगाव रेल्वे :

          नवाकोरा गणवेश, नवे दप्तर, पायात बूट-मोजे, शाळेतून मिळालेले मोफत पुस्तक, तसेच शिक्षकांनी गुलाब पुष्प देऊन केलेले स्वागत अशा अनोख्या वातावरणात सोमवारी (ता.२३) शाळांची पहिली घंटा वाजली. शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमांतर्गत तालुकाभरातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे पहिल्या दिवशी लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी स्वागत केले.दरम्यान तालुक्यातील शहापूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी मध्यान्ह भोजनात पुरण पोळीचा आस्वाद घेतला.

शहापूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी घेतला पुरण पोळीचा आस्वाद

       शहापूर येथे पुरण पोळीचा आस्वाद घेतांना विद्यार्थी

सोमवारी (ता.२३) नवीन शैक्षणिक वर्षाची सुरूवात झाली. जिल्हा परिषदेच्या इतर व्यवस्थापनाच्या दीड हजार शाळांची घंटा वाजली. शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमांतर्गत यंदा लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनाही शाळांत भेट देण्याच्या सूचना शासनाच्या होत्या. त्यानुसार गटविकास अधिकारी योगेश वानखडे, गटशिक्षणाधिकारी सपना भोगावकर, गटसमन्वक धीरज जवळकार, विस्तार अधिकारी सचिन मिसाळ, निलेश वाघ, शुभम खंडेझोड, दिलीप जोल्हे, दीपक नवाते, गोकुल बांबल,अभियंता प्रवीण आखरे, अभिजीत कल्ले, मोहन देशमुख, बी.एम.सरदार, केंद्र प्रमुख सुनील भावेकर, डी.एस.राठोड, अनिल ठाकरे, संजय तायडे, गौरव खोंडे, विषय साधन व्यक्ती शेषराव चव्हाण, कलेश कांबळे, ज्योती राऊत, वैशाली लिलरव्हे, रविकिरण खवले, प्रवीण ठाकरे, मनोज शिंगणापूरे, वैभव गवते, हेमंत कोटंबकर, वैशाली सोनापरोते, मिलिंद मोहोड आदींनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. समारंभपूर्वक केलेल्या स्वागतामुळे सर्व विद्यार्थी आणि पालकभारावून गेले होते. या स्वागतामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद व समाधान दिसत होते.

रांगोळ्या, प्रभातफेरी, पुस्तक वाटप

शाळा प्रवेशोत्सवप्रसंगी जिल्हा परिषदेचे सर्व अधिकारी, सर्व विभागांचे विभागप्रमुख, तालुकास्तरावरील तहसीलदार, गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांच्यासह तालुक्यातील अधिकाऱ्यांनी शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले.नवागतांच्या स्वागतासाठी रांगोळी, फुलांनी वर्ग सजावट करण्यात आली होती. गावागावातून प्रभातफेऱ्यांचे आयोजन करण्यात आले होते.पहिले पाऊल उपक्रमांतर्गत इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांच्या पावलांचे ठसे घेऊन पालकांना त्यांची प्रतही देण्यात आली.

 

आयुष्यात यशस्वी होण्यासाठी लागणारी जीवनकौशल्ये मला सरकारी शाळेतच मिळाली. समाजाचे भवितव्य शिक्षकांच्या हाती असून, त्यांनी सदृढ नागरिकांची पिढी घडवावी, अशी अपेक्षा आहे – योगेश वानखडे,गटविकास अधिकारी पंचायत समिती धामणगाव रेल्वे

मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!