सामाजिक

राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पाची आढावा बैठक संपन्न

प्रतिनिधी

राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प,महाराष्ट्र यांची आढावा बैठक छ.संभाजीनगर, सुभेदारी गेस्ट हाऊस येथे पार पडली. यात विविध विषय वर चर्चा करण्यात आली.

ज्यामध्ये बालकामगार प्रकल्प मार्च २०२२(लॉक डाउन) बंद झाल्याने बालमजूर ह्यांची संख्या वाढली. १५ ते २० वर्षा पासून अल्प मानधनात (३४०० ते ७०००) आपले संपूर्ण आयुष्य राष्ट्रीय सेवेत घातलीय ते सर्व कर्मचारी बेरोजगार झाले.. आता त्यांची मुलं बालकामगार होण्याच्या उंबरठ्या आहे… ते कर्मचारी आता कुठं ही शासकीय/निम शासकीय तथा खासगी नौकरीत काम करण्याची वयो मर्यादा ओलांडली आहे. शासकीय सेवेत अथवा समग्र शिक्षा अभियान या प्रकल्पात समायोजन करणे संबंधी वर्ष २०१४ पासून शासन दरबारी पाठपुरावा हे कर्मचारी करीत आहेत… सदरील समायोजन चा प्रस्ताव कामगाग विभाग, मुंबई ह्यांच्या कडे प्रलंबित आहे. प्रकल्प कर्मचारी ह्यांना शासकीय सेवेत समायोजन करण्यात यावे या करिता महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातील मा. आमदार साहेब ह्यांनी मा. मुख्यमंत्री ह्यांच्या नावे शिफारस देखील केलेली आहे. तरी अद्याप यावर निर्णय झालेला नाही ज्या मुळे त्यांच्या वर उपासमारीची वेळ आलेली आहे… बालमजूर व प्रकल्पत काम करणाऱ्या करणाऱ्या कर्मचारी ह्यांची ही पिळवणूक 2022 पासून हा प्रकल्प समग्र शिक्षा अभियान यात विलीन केल्या पासून झाला.
या बैठकीसाठी प्रमुख मार्गदर्शक आपल्या Nclp प्रकल्पाचे शिक्षक अमरावती जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे प्रमुख संघटक धर्मशील मेश्राम यांनी अत्यंत सखोल असे मार्गदर्शन करून त्यांनी केलेल्या कामाचा आढावा, केलेल्या कामाचा पाठपुरावा कसा केला याबाबत तपशीलवार माहिती दिली. तसेच पुढील दिशा स्पष्ट केली. या बैठकीचे आयोजन संभाजीनगर चे जिल्हाध्यक्षअमोल पाटील, बुशरा संस्थेचे अध्यक्ष महेबुब शेख यांनी सुभेदारी शासकीय विश्राम गृह येथे बैठक यशस्वी होण्यासाठी अनमोल सहकार्य केले. या बैठकीला राज्यातील अनेक जिल्ह्यातील प्रमुख शिक्षक उपस्थित होते.
या बैठकीत मंगेश भाले, सुभाष पंडुरे, गणेश धोंगडे, भगवान हिवर्डे, लक्ष्मी वाघमारे, आदींनी आपले मनोगत व्यक्त करून पुढील दिशा ठरविण्यासाठी महत्वाच्या सूचना मांडल्या यामध्ये राज्यातील, सर्व Nclp प्रकल्पातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांना एकत्रित करून मुंबई दरबारी वेळप्रसंगी लोकशाही पद्धतीने आंदोलन करून न्याय मिळेपर्यंत पाठपुरावा करण्यासाठी एकमत झाले बैठकीचे सूत्रसंचलन सिल्लोड येथील Nclp प्रकल्पाचे शिक्षक संजय शेळके यांनी केले. आभार बीड जिल्हा येथील शिक्षक शेख सर यांनी मानले. बैठक यशस्वी करण्यासाठी उपस्थित सर्वांनी विशेष प्रयत्न केले.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!