अमरावती

ग्रामपंचायत निवडणुकीचा वाजला बिगुल ! सरपंच पदाची आरक्षण सोडत येत्या २३, २४ ला

धामणगाव तालुक्यातील ग्रामपंचायत निहाय सरपंच पदाचे आरक्षण सोडत २४ एप्रिल ला

धामणगाव रेल्वे –

              अमरावती जिल्ह्यातील एकूण १४ तालुक्यातील ग्रामपंचायत निहाय सरपंच पदाची आरक्षण सोडत येत्या २३ व २४ एप्रिल ला संबंधित तहसील कार्यालयात उपविभागीय अधिकारी तथा नियंत्रण अधिकारी यांच्या देखरेखेखाली पार पडणार आहे.
मार्च २०२५ ते मार्च २०३० या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूकद्वारे गठीत होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण जिल्ह्यातील संपूर्ण १४ तालुक्यामध्ये तहसीलदार यांच्याद्वारे अनु. जाती, अनु. जमाती व ना. मा. प्र. पदाकरिता महिला आरक्षणासह सरपंच पदाकरिता संबंधित सर्व तहसील स्तरावर प्राधिकृत अधिकारी तथा तहसीलदार यांच्या अधिपत्याखाली दि. २३ आणि २४ एप्रिल रोजी संबंधित तहसील कार्यालय सभागृह येथे ठीक १२ वाजता आयोजित केली आहे.
यात २३ एप्रिल रोजी – अमरावती, भातकुली, चांदुर रेल्वे, मोर्शी, दर्यापूर, अचलपूर, धारणी या तालुक्यातील सरपंच पदाची आरक्षण सोडत होणार आहे तर
२४ एप्रिल रोजी – नांदगाव खंडेश्वर, तिवसा, धामणगाव रेल्वे, वरुड, अंजनगाव सुर्जी, चांदुरबाजार, चिखलदरा या तालुक्यातही सरपंच पदाचे आरक्षण सोडत होणार आहे.
करिता संबंधित नागरिकांनी व सदस्यांना आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांच्याकडून करण्यात आले आहे.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!