समृद्धी महामार्गावर छुप्या मार्गाने सुरु होती गौवंशाची अवैध तस्करी
दिनांक ०३ फेब्रुवारी रोजी रात्री समृद्धी महामार्ग लेन नंबर १५२ व १५३ च्या मधात जनावराची वाहतूक करणारा ट्रक क्रमांक एम एच ४० सी डी ४८८१ नागपूर कडुन पुणे येथे घेऊन जात असताना रोडवर उभा असलेल्या ट्रक क्रमांक एम एच ४३ बी पी ४८१५ या ट्रकला येऊन धडकल्याने मोठा अपघात घडला. तसेच सदरच्या अपघाताने गौवंशाची अवैध तस्करी होत असल्याची बाबा उघडकीस आली.
घड्लेला अपघात मंगरूळ चव्हाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असल्यामुळे मंगरूळ चव्हाळा पोलीस स्टेशनला माहिती देण्यात आल्यानंतर मंगरूळ चव्हाळा पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून पशुधन विकास अधिकारी पापड यांच्याशी संपर्क साधला असता जखमी जनावरांना औषधोपचार करण्यासाठी डॉ. हेमंत जाधव पशुधन विकास अधिकारी पापड, डॉ.निरंजन डांगे पशुधन पर्यवेक्षक फुल आमला, डॉ. राजीव गाडगे पशुधन पर्यवेक्षक भुगाव, डॉ. देवानंद पायघन सहाय्यक पशुधन विकास अधिकारी मंगरूळ चव्हाळा यांनी टिम घटना स्थळी हजर झाली.
जखमी गौवंशाची तपासणी केली एकूण ३८ जनावरापैकी १० जनावरांना मृत घोषित करण्यात आले व उर्वरित २८ जनावरांवर योग्य तो औषधोपचार करून डॉ. पंजाबराव देशमुख गौशाळा कणी मिर्झापूर ता.नांदगाव खंडेश्वर येथे पाठवण्यात आले. मृत जनावरांचे पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या पडीत जागेवर विधीवत पूजन करून पुरण्यात आले.
यावेळी मंगरूळ चव्हाळा चे ठाणेदार रवींद्र बारड, मनोज सावरकर, पी एस आय व पोलिस अंमलदार हटवार व ईतर कर्मचारी हजर होते. पुढील तपास मंगरूळ चव्हाळा चे ठाणेदार व त्यांचे सहकारी करत आहे.
Add Comment