धामणगाव रेल्वे

चालक दिनानिमित्त मंगरूळ द. पोलिसांची वाहन चालकांना विशेष भेट

सुरक्षेचे महत्व पटवून देत चालकांना हेल्मेट चे वाटप

धामणगाव रेल्वे 

पोलीस स्टेशन मंगरूळ दस्तगीर हद्दीत आज दि. १७ सप्टेंबर २०२६ रोजी चालक दिनानिमित्त ऑपेरेशन कवच अंतर्गत ठाणेदार संजय आत्राम यांच्या मार्गदर्शनात विशेष मोहीम राबविण्यात आली. पोलीस स्टेशन हद्दीतील विटाळा पॉइंटवर चालक दिनानिम्मित वाहन चालकाचे पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देत स्वागत करण्यात आले. तसेच रस्ता सुरक्षा व वाहतूक नियमांचे पालन करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

 दुचाकीस्वारांनी वाहन चालविताना हेल्मेट किती महत्वाचे आहे, हेल्मेटचा वापर केल्यास आपलेच नाही तर आपल्या परिवाराचे सुद्दा संरक्षण केल्या जाते. त्यामुळे हेल्मेटचा नियमित वापर करावा, वेगावर नियंत्रण ठेवावे, वाहन चालविताना मोबाईलचा वापर टाळावा तसेच स्वतःच्या व इतरांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी, याबाबत जनजागृती करण्यात आली. रस्ता अपघातांमध्ये दुचाकीस्वारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हेल्मेटचे महत्त्व पटवून देत ज्या चालकांकडे लायसन्स उपलब्ध आहे आणि जे नियमांचे पालन करतात अशा चालकांना हेल्मेटचे वाटप करण्यात आले.

सदरची जनजागृती करताना यावेळी स्वतः मंगरूळ द. चे ठाणेदार संजय आत्राम, एस आय डवरे, पोलीस हेडकॉन्स्टेबल अमरदीप वाघमारे, पोलीस कॉन्स्टेबल जीवन लांडगे, भूषण सैनिक रितेश इतर कर्मचारी उपस्थित होते.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!