धामणगाव रेल्वे

धामणगाव रेल्वेत दर गुरुवारी उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे कामकाज

आमदार प्रताप अडसड यांच्या पाठपुराव्याला यश ; बार असोसिएशनच्या मागणीला मंजुरी

धामणगाव रेल्वे प्रतिनिधी 

धामणगाव रेल्वे येथील नागरिकांना मोठा दिलासा देणारा निर्णय प्रशासनाने घेतला असून, आता दर गुरुवारी धामणगाव रेल्वे येथे उपविभागीय अधिकारी (एसडीओ) कार्यालयाचे कामकाज उपलब्ध होणार आहे. या निर्णयामुळे नागरिकांना अनेक प्रशासकीय कामांसाठी अमरावती किंवा इतर ठिकाणी जाण्याची गरज कमी होणार आहे.
धामणगाव रेल्वे येथे उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे नियमित कामकाज सुरू करण्याची मागणी धामणगाव रेल्वे बार असोसिएशनने केली होती. या मागणीची दखल घेत आमदार प्रतापदादा अडसड यांनी संबंधित प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
या निर्णयामुळे शेतकरी, पक्षकार, वकील तसेच सर्वसामान्य नागरिकांना महसूल व इतर प्रशासकीय कामे स्थानिक पातळीवरच करता येणार आहेत. त्यामुळे वेळ, खर्च आणि प्रवासाचा त्रास कमी होऊन प्रशासकीय सेवा अधिक सुलभ आणि गतिमान होण्यास मदत होणार आहे.

बार असोसिएशनकडून स्वागत

धामणगाव रेल्वे बार असोसिएशनने या निर्णयाचे स्वागत करत आमदार प्रतापदादा अडसड यांचे आभार मानले. बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. राजेश चांडक, सचिव ऍड. तुषार मनोहर फाळे, कोषाध्यक्ष ऍड. प्रसाद कावळे यांच्यासह ज्येष्ठ अधिवक्ता ऍड. आर. जे. चांडक, ऍड. एन. एम. राहाटे, ऍड. सुरेश एस. फाळे, उपाध्यक्षा ऍड. सुवर्ण भोंगाडे, सहसचिव ऍड. दीपाली तिरभाने व ऍड. सुजाता पाटील तसेच बार असोसिएशनच्या सर्व सदस्यांनी आमदारांचे अभिनंदन करून कृतज्ञता व्यक्त केली.
स्थानिक स्तरावर उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे कामकाज सुरू होणार असल्याने धामणगाव रेल्वे परिसरात समाधान आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!