धामणगाव रेल्वे

से. फ. ला. हायस्कूलमध्ये गणेशोत्सव ; ९८ वर्षाची परंपरा कायमच

५ दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन…

धामणगाव रेल्वे

धामणगाव रेल्वे स्थानिक धामणगाव एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित सेठ फत्तेलाल लाभचंद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये १९२९ मध्ये मुख्याध्यापक शंकर जागेश्वर भागवत यांनी शालेय गणेशोत्सवाला प्रारंभ केला. स्वातंत्र्य पूर्वीचा हा गणेशोत्सव आज २०२६ पर्यंत सुद्धा उत्साहात सुरू आहे. आज ९८ वर्षा पासूनची ही परंपरा सुरूच आहे. येथे नुकतीच पर्यावरण पूरक मातीच्या श्री गणेशाच्या मूर्तीची विद्यालयाचे प्राचार्य प्रशांत शेंडे यांच्या हस्ते व तसेच से.फ.ला. विद्यालयाचा नाद ढोल ताशा ग्रुप यांच्यातर्फे मोठ्या उत्साहात गजरात स्थापना झाली. शाळेचे नवनिर्वाचित संमेलन कार्यवाह यश पंकजराव ठाकरे (वर्ग १२ वा ) संमेलन सहकार्यवाह प्रियांशु पंकज गायकवाड ( वर्ग १० वा ) विद्यार्थ्यांनी प्रतिनिधी कु. सुहानी शंकर कोळमकर (वर्ग १२ वा ) व सर्व विद्यार्थी मंडळातर्फे विविध मनोरंजन कार्यक्रम त्यामध्ये गणपतीची चित्र सजावट स्पर्धा, अंताक्षरी स्पर्धा, वन मिनिट शो, मिनिट टू विन इट, भजन सादरीकरण अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

विद्यालयाचे प्राचार्य प्रशांत शेंडे, उपप्राचार्य प्रमोद हातेकर, पर्यवेक्षक नरेश कावलकर तसेच संमेलन प्रभारी कैलाश चौधर, समीर हिरूरकर यांचे मार्गदर्शन विद्यार्थी मंडळाला लाभले. विद्यालयाच्या प्रत्येक कार्यक्रमात विद्यालयाचे कलाशिक्षक अजय जिरापुरे हे विविध प्रसंगावर फलक रेखाटन करून विद्यार्थ्यांमध्ये उत्साह आणण्याचा प्रयत्न करतात. या गणेशोत्सवाला अजय जिरापुरे यांनी विद्यालयाच्या दर्शनी फलकावर रंगीत खडूच्या माध्यमातून ” सिद्धिदाता ” गणेशाचे सुंदर चित्र रेखाटन केले आहे व ते सर्वांचे आकर्षणाचे स्थान बनले आहे. सोबतच गणपती मूर्तीच्या मागचा देखावा सुद्धा इको फ्रेंडली पद्धतीने कला शिक्षक अजय जिरापुरे व त्यांच्या विद्यार्थिनींनी साकार केला आहे. किल्यांची प्रतिकृती ही साध्या कागदी पुठ्ठ्यांच्या व विविध रंगीत टिंटेड शीट माध्यमातून साकार केली. किल्ले हे आपली संस्कृती आपला अभिमान आहे. शिवाजी महाराजांच्या गडकिल्यांचे संवर्धन करणे हे प्रत्येकांची नैतिक जबाबदारी आहे..

छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे किल्ले हा संपूर्ण महाराष्ट्राचा आणि भारताचा अत्यंत जाज्वल्य अभिमान आहे. महाराजांनी आपल्या कुशल युद्धनीतीने आणि दूरदृष्टीने महाराष्ट्राच्या डोंगर-दर्‍यांमध्ये बलाढ्य किल्ल्यांचे जाळे निर्माण केले, ज्याला ‘स्वराज्य’ म्हटले गेले..हे किल्ले केवळ दगडा-धोंड्यांच्या भिंती नसून आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाची, बलिदानाची आणि स्वाभिमानाची जिवंत स्मारके आहेत..हाच संदेश आपल्या प्रतिकृतीच्या माध्यमातून सादर केला…

मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!