शासकीय शेती विषयक

६ फेब्रुवारीला भूमी अभिलेख कार्यालयात जनता दरबाराचे आयोजन

पालकमंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशाची अंमलबजावणी

धामणगाव रेल्वे 

नागरिकांच्या शेती संदर्भात वाढत्या तक्रारी लक्षात घेता अमरावती जिल्हयाचे पालकमंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिनांक २४ जानेवारी २०२६ रोजी जिल्हा अधीक्षक भुमी अभिलेख महेशकुमार शिंदे यांना जनतेच्या भुमी अभिलेख विषयक तक्रारींचे तात्काळ निराकरण करण्याच्या उद्देशाने जिल्हयातील भूमी अभिलेख कार्यालयामध्ये जनता दरबार आयोजित करण्याच्या सूचना निर्गमित केल्या होत्या. त्या अनुषंगाने जिल्हा अधीक्षक भुमी अभिलेख यांनी दिनांक २९ जानेवारी २०२६ रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार संबंधित भूमी अभिलेख कार्यालयात जनता दरबाराचे आयोजन करण्यास सांगितले. त्यामुळे दिनांक ०६ फेब्रुवारी २०२६ शुक्रवार रोजी दुपारी ३.०० ते ६.०० वाजेपर्यंत उप अधीक्षक भुमी अभिलेख धामणगांव रेल्वे कार्यालयात जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे.
         या जनता दरबारात जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख महेशकुमार शिंदे स्वतः उपस्थित राहून जनतेच्या समस्यांचे तात्काळ निराकरण करणार असल्याचे प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे. त्याकरिता जास्तीत जास्त नागरिकांनी आपल्या तक्रारी घेऊन जनता दरबारात उपस्थित राहून त्याचे निराकरण करून घ्यावे असे आवाहन किशोर सानप उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय धामणगाव रेल्वे यांनी केले आहे.

६ फेब्रुवारी रोजी आयोजित जनता दरबारात धामणगाव तालुक्यातील समस्त नागरिकांनी आपल्या तक्रारीचे अनुषंगाने भूमी अभिलेख कार्यालयात उपस्थित राहून आपले तक्रारींचे निराकरण करून घ्यावे – किशोर सानप, उप अधीक्षक भूमी अभिलेख, धामणगाव रेल्वे

मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!