क्राईम

७२ वर्षांच्या आजोबाकडून १२ वर्षांच्या मुलीवर बलात्कार, शरीराचे अक्षरश: लचके तोडले

जनसूर्या मीडिया

उत्तराखंडच्या नैनीतालमध्ये मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. १२ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर ७२ वर्षांच्या व्यक्तीने बलात्कार केला. २०० रुपयांचे आमिष दाखवून आरोपी या मुलीला सोबत घेऊन गेला आणि तिच्यावर एका कारमध्ये बलात्कार केला. कुणाला सांगितले तर तुझ्यासह कुटुंबाला जीवे मारेल अशी धमकी आरोपीने दिली. त्यामुळे घाबरलेल्या मुलीने कुणालाच काही सांगितले नाही. पण तिची अवस्था खूपच गंभीर आहे. तिला चालता येत नाही न बसता येत नाही. या घटनेमुळे उत्तराखंड हादरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १२ एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास पीडित मुलगी बाजारात सामान खरेदी करण्यासाठी गेली होती. त्याठिकाणी तिला ७२ वर्षांचा उस्मान नावाचा व्यक्ती भेटला. उस्मान कंत्राटदार म्हणून काम करतो. त्याने मुलीला २०० रुपयांचे आमिष दाखवले आणि तिला स्वत:च्या घरी नेले. त्यानंतर त्याने घरासमोर गॅरेजमध्ये पार्क असलेल्या कारमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला. जेव्हा मुलीने विरोध केला तर त्याने तिला चाकूचा धाक दाखवून तिला आणि तिच्या आईसह संपूर्ण कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली.
या घटनेमुळे मुलगी प्रचंड घाबरली. तिला प्रचंड वेदना होत होत्या. वेदनेने अक्षरश: ती तडफडत होती. मुलीच्या वेदना इतक्या तीव्र झाल्या की तिला नीट बसता किंवा उभे राहता येत नव्हते. त्यानंतर ती १० दिवस गुडघ्यांवरच चालत होती. उस्मानच्या भीतीमुळे मुलीने तिच्यासोबत काय घडलं हे कुणालाच सांगितले नाही. पण तिची प्रकृती आणखी खराब झाली. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी तिला रुग्णालयात नेले ज्याठिकाणी डॉक्टरांनी आधी तिला पोलिस ठाण्यात जा असे सांगितले.
डॉक्टरांनी तिच्यावर उपचार केले नाही. त्यामुळे उपचार न करता तिच्या आईने तिला परत घरी आणले. त्यानंतर मुलीने रडत रडत घडलेला सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला तेव्हा ती हादरली. याप्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या घटनेनंतर उत्तराखंडमध्ये खळबळ उडाली आहे. या घटनेचा तपास पोलिस करत आहेत.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!