धक्कादायक

पत्नी आणि सासूच्या जाचाला कंटाळून तरुणाने व्हिडिओ बनवून संपविली जीवनयात्रा

कॉलवर आई वडिलांची मागितली माफी; पत्नी आणि सासूवर केले गंभीर आरोप

जनसूर्या मीडिया

पत्नीच्या छळाला कंटाळून बेंगळुरू येथील एआय इंजिनिअर अतुल सुभाष यांनी जीवन संपविले. यांनतर पत्नींच्या छळामुळे पतींनी आत्महत्या केल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमधून असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका २५ वर्षीय तरुणाने पत्नी आणि सासरच्या लोकांवर छळ केल्याचा आरोप करत गळफास घेऊन आत्महत्या केली. गळफास घेण्यापूर्वी त्या तरुणाने एक व्हिडिओ बनवला आणि तो सोशल मीडियावर अपलोड केला. ज्यामध्ये त्याने आपल्या पालकांची माफी मागितली आणि त्याच्या मृत्यूसाठी सासरच्या लोकांना जबाबदार धरले.
भोपाळमधील अशोका गार्डनमधील गौतम नगर भागातील रहिवासी असलेल्या २५ वर्षीय अभिषेक भचाले यांनी शुक्रवारी रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी अभिषेकने गळ्यात फास अडकवून एक व्हिडिओ बनवला आणि तो त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटच्या स्टोरीवर पोस्ट केला.
व्हिडिओमध्ये अभिषेकने त्याच्या आईवडिलांची माफी मागितली आहे. त्याने त्याच्या आत्महत्येसाठी त्याची पत्नी आणि सासरच्या लोकांना जबाबदार धरले आहे. अभिषेकने आरोप केला की, त्याचे सासरचे लोक त्याचा छळ करतात. यामुळे त्याने आत्महत्येसारखे चुकीचे पाऊल उचलले आहे.
अशोका गार्डन पोलिस स्टेशनचे प्रभारी हेमंत श्रीवास्तव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, मृत तरुणाचा चार वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता, परंतु घरात दररोज वाद होत होते. त्याच्या पत्नीनेही महिला पोलिस ठाण्यात पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. मृत तरुणाच्या कुटुंबीयांचे जबाबही नोंदवण्यात आले आहेत. गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि तपास सुरू करण्यात आला आहे.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!