जनजागृती निमित्ताने रॅली चे आयोजन
धामणगाव रेल्वे
श्री दत्ताजी मेघे बाल कल्याण शिक्षण संस्था द्वारा संचालित स्कूल ऑफ स्कॉलर्स मध्ये जागतिक वसुंधरा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. वसुंधरा दिनानिमित्त एस ओ एस कब्स पासून ते गांधी चौक पर्यंत रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये शाळेच्या मुख्याध्यापिका के साई नीरजा, शाळेच्या पर्यवेक्षिका शबाना खान वर्ग दहावीचे विद्यार्थी, वर्ग शिक्षक शुभम मिश्रा, विज्ञान शिक्षक विश्वास हिंगवे उपस्थित होते.














Add Comment