शैक्षणिक

जि.प. शाळा रामगाव येथील विद्यार्थ्याकडून ग्राम स्वच्छता अभियानाला सुरवात

“स्वच्छ ही सेवा” उपक्रमा निमित्य विविध स्वच्छता संबधिचे उपक्रम

धामणगाव रेल्वे – प्रतिनिधी

मुख्यंमत्री महाराष्ट्र शासन यांनी राबवलेली ” स्वच्छ ही सेवा अभियानार्तंग ” जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा रामगाव येथे विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले . गावात प्रभात फेरी घेवून शाळेत सामुहिक स्वच्छतेची शपथ घेतली. विद्यार्थानी त्याचबरोबर शिक्षकांनी शाळेत संपूर्ण वर्ग साफसफाई केली. गावात स्वच्छता प्रभात फेरी काढून स्वच्छतेचे घोषवाक्य म्हटले. घराजवळील कचर्‍याबाबत लोकांना विद्यार्थ्यानी विनंती करून स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. तसेच मुलांनी घोषवाक्य पाट्या तयार केल्या.

शाळेत आणि घरातील टाकावू वस्तुपासून शोभेच्या वस्तु तयार करण्यात आली. कागदापासून विविध वस्तु बनविण्यात आले. भाषणे, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा चे आयोजन करण्यात आले. स्वच्छता अभियानात सर्व नागरिकानी सहभाग घेवून आपला गाव परिसर स्वच्छ करण्यासाठी देशकार्यात हातभार लावण्याचे आव्हाहन शाळेकडून करण्यात आले.
          कार्यकमाच्या यशस्वीतेबदल शाळेचे मुख्याध्यापक नामदेव जाधव व सुनिल राठोड यांनी परिश्रम घेतले. सुनिल राठोड यांनी गावातील वरिष्ठ मंडळीना स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. या कार्यक्रमात शाळेतील व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष व सदस्यानी तसेच ग्रामपंचायत सदस्यांनी सहभाग घेतला.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!