धामणगाव रेल्वे शेती विषयक

मंडळ अधिकारी संगिता धारणे यांच्या नेतृत्वात तब्बल ३ वर्षांपासून रखडलेल्या पांदण रस्त्याने घेतला मोकळा श्वास

जे काम पुरुष अधिकाऱ्यांना जमले नाही ते काम महिला अधिकाऱ्यांनी दाखविले करून

धामणगाव रेल्वे

२०२३ मध्ये नायब तहसिदार नामदेव गंडलिंग यांच्या अधोरेखित आदेशित झालेला गंगाजळी विरूळ पांदण रस्ता तब्बल ३ वर्षानंतर आज दि. २५ मार्च २०२६ रोजी मोकळा करण्यात आला. जे काम पुरुष अधिकारी यांच्या नेतृत्वात झाले नाही ते संगिता धारणे महिला मंडळ अधिकाऱ्याच्या नेतृत्वात पूर्ण झाल्याने शेतकरी वर्गातून या महिला अधिकाऱ्याचे कौतुक होत आहे. यापूर्वी नायब तहसीलदार आशिष वीर, वसंत पखाले, नरेंद्र सयाम मंडळ अधिकारी विजय मसने, नरेंद्र उईके, असे एक ना अनेक अधिकारी पोलीस बंदोबस्तात गंगाजळी येथील शेत सर्वे न. १७५,१७६, १८०, १८१ या शेताला मिळालेला पांदण रस्ता मोकळा करण्यासाठी आले मात्र कोणत्या ना कोणत्या कारणास्तव आदेश होऊन सुद्धा रस्ता मोकळा करण्यात आला नव्हता. मात्र आज रोजी मंडळ अधिकारी संगिता धारणे यांच्या नेतृत्वात त्यांच्या कर्मचाऱ्याच्या अधिनस्त व शेतकऱ्यांच्या उपस्थितीत आदेशित रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे.

  ३ वर्षांपासून रखडलेला शेत रस्ता मोकळा करून देताना मंडळ अधिकारी सह त्यांच्या टीम 

 

पालकमंत्री यांच्या सूचनेनुसार महाराजस्व अभियानामुळे पांदण रस्ते मोकळे करण्याला आला वेग

छत्रपत्री शिवाजी महाराज महा राजस्व अभियान अंतर्गत १८ फेब्रुवारी रोजी तहसील कार्यालयात घेण्यात आलेल्या कार्यक्रमात तहसीलदार अभय घोरपडे यांच्याकडे रखडलेल्या रस्त्याबाबत विषय मांडण्यात आला त्यावर त्यांनी लगेच नायब तहसीलदार रितुराज पिटुरकर यांना संबंधित रस्ता मोकळा करण्यासंदर्भात सूचना केला होत्या. त्या अनुषंगाने रस्ता मोकळा करण्यासाठी मंडळ अधिकारी संगिता धारणे याना सूचित करण्यात आले होते. त्यामुळे आज सकाळी १० वाजता पासूनच मंडळ अधिकारी आपल्या चमूसह घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. सुरुवातील काही शेतकऱ्यांनी नेहमीसारखे आपले गाऱ्हाणे मांडले मात्र नकाशानुसार पांदण रस्ता मोकळा केल्यास चारही शेतकऱ्यांच्या शेताचे दोन भाग पडणार असे तटस्थपणे सांगितल्यानंर काही शेतकऱ्याने नमते घेत सामंजस्याने आपल्या धुऱ्यालगत ८ फूट रस्ता मोकळा करून घेतला. यामध्ये मंडळ अधिकाऱ्यांसह ग्राम महसूल अधिकारी तातेश्वर पाटील यांनी अतिशय महत्वाची भूमिका बजावली. दरम्यान गंगाजळी येथील शेत सर्वे न. १७५,१७६, १८०, १८१ शेताचा संपूर्ण रस्ता मोकळा करतेवेळी मंडळ अधिकारी संगिता धारणे, ग्राम महसूल अधिकारी पूजा बोटरे, तातेश्वर पाटील, गणेश उईके, राहुल पराते, कर्मचारी प्रदीप देशमुख, दिलीप वाळके सह शेतकरी उत्तम वानखडे, विनायक वानखडे सतीश गावंडे, अंकुश वानखडे, श्रीधर गावंडे, दादाराव उईके उपस्थित होते…
मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!