धक्कादायक धामणगाव रेल्वे

ओलित करण्यासाठी गेलेल्या युवा शेतकऱ्याचा कॅनल च्या पाटसरित पडून मृत्यू

वाघोली शेत शिवारात घडली धक्कादायक घटना

धामणगाव रेल्वे

शेतात गव्हाला ओलित करण्यासाठी गेलेल्या एका ३२ वर्षीय युवा शेतकऱ्याचा कॅनल च्या पाटसरित पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना धामणगाव तालुक्यातील वाघोली शेत शेतशिवारात उघडकीस आली. दिनेश दीपक मरकाम असे मृतक युवा शेतकऱ्याचे नाव आहे. .
जळगाव मंगरूळ येथील रहिवाशी मृतक दिनेश दीपक मरकाम यांचे वाघोली शेतशिवारात सूतगिरणीचे बाजूला मुख्य रोडलगत ३ एकर सामूहिक शेत आहे. शेतात गहू पेरला असून त्याला ओलित करण्याकरिता दिनेश काल दि. ०९ मार्च सकाळी १० च्या सुमारास गेला होता मात्र घरी परतलाच नसल्यामुळे घरच्यांनी त्याचा शोध सुरु केला असता आज दि. १० मार्च रोजी सकाळी ८ च्या सुमारास शेतालगत असलेल्या कॅनल च्या पाटसरित दिनेश याचा मृतदेह तरंगताना त्याच्या चुलत भावास आढळून आला. मृतक दिनेश मरकाम याला फिट येत असल्याची माहिती त्याच्या घरच्यांनी दिली, काम करत असताना फिट आल्यामुळे त्याचा पाण्यात पडून मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.. लहान वयातच वडिलांचे छत्र हरविले असताना, मुलगा असा अचानक निघून गेल्याने त्या एकट्या मातेवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.
दरम्यान सदरची माहिती पोलिसांना दिली असता पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला असून उत्तरीय तपासणी करिता मृतदेह ग्रामीण रुग्णालय धामणगाव रेल्वे येथे पाठविण्यात आला आहे.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!