गटशिक्षणाधिकारी सपना भोगावकर यांनी विद्यार्थ्यांशी साधला अध्ययन अनुभवावर संवाद
धामणगाव रेल्वे प्रतिनिधी
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक सहली खूप महत्त्वाच्या असतात. त्यामुळे त्यांना स्वतःहून शिकण्याची संधी मिळते. विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासाशी संबंधित गोष्टींशी परिचित करून देण्यासाठी सहलींचे आयोजन करते. दरम्यान तालुक्यातील जुना धामणगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी पक्षी निरीक्षणाचा आनंददायी अनुभव घेतला.
पीएम श्री शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहली आयोजित केल्या जातात. या सहलींमुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासांशी संबंधित गोष्टींची ओळख होते. याशिवाय, त्यांना व्यावहारिक कौशल्ये विकसित करण्याची, आत्मविश्वास निर्माण करण्याची आणि चिरस्थायी आठवणी निर्माण करण्याची संधी मिळते. विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासांना वास्तविक-जागतिक अनुप्रयोगांशी जोडण्यात मदत करणे.विद्यार्थ्यांना स्वतःहून शिकण्याची संधी देणे आवश्यक आहे.त्यानुसार तालुक्यातील जुना धामणगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहलीचे आयोजित करण्यात आली होती.विद्यार्थ्यांनी पक्षी निरीक्षणाचा आनंददायी अनुभव घेतला.
पक्षी निरीक्षणाने पर्यावरणाचे महत्त्व समजून घेण्यास झाली मदत
परिसर अभ्यास आदी प्रत्यक्ष अनुभव घेतला.पक्षी निरीक्षणाने विद्यार्थ्यांना निसर्गातील विविधता आणि पर्यावरणाचे महत्त्व समजून घेण्यास मदत झाली. सहलीत विद्यार्थ्यांसह गटशिक्षणाधिकारी सपना भोगावकर,उच्च श्रेणी मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख जगदीशकुमार सिरसाट, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा रेखा आमले, शिक्षक ज्योती बकाले, सविता सुपटकर, संगीता चौधरी, जयश्री शिमरे, अर्चना नाहे, शेषराव चव्हाण, संजय शेलोरकर प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेच्या संगीता चौधरी आदी सहभागी झाले होते.
विद्यार्थ्यांनी पक्षी निरीक्षणाचा आनंद घेतला. या कार्यक्रमांतर्गत, त्यांनी विविध पाणथळ ठिकाणी आणि निसर्गरम्य स्थळांना भेटी दिल्या, जिथे त्यांनी विविध प्रजातींचे पक्षी पाहिले आणि त्यांची माहिती घेतली. या अनुभवामुळे विद्यार्थ्यांना निसर्गाबद्दल आणि पक्ष्यांबद्दलची माहिती मिळाली, ज्यामुळे निसर्गाचे महत्त्व त्यांना समजले – सपना भोगावकर,गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती धामणगाव रेल्वे













Add Comment