धामणगाव रेल्वे

तालुक्यातील ग्रामसेवकांच्या हेकेखोर वृत्तीमुळे खऱ्या बांधकाम कारागारांचे नुकसान ?

गवंडी बांधकाम मजदूर युनियन व श्रमिक इमारत व इतर बांधकाम कामगार संघटना चे गटविकास अधिकारी याना निवेदन

धामणगाव रेल्वे – प्रतिनिधी

मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आदेशपत्र असताना सुद्धा तालुक्यातील ग्रामसेवक बांधकाम कामगारांच्या ९० दिवसाच्या प्रमाणपत्रावर सही शिक्का देण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याने खऱ्या कामगारांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळण्यास विनाकारण विलंब होऊन त्यांचे नुकसान होत असल्याची ओरड कामगार संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे. त्याकरिता सदरच्या विषयावर त्वरित तोडगा काढण्यासंदर्भात गवंडी बांधकाम मजदूर युनियन व श्रमिक इमारत व इतर बांधकाम कामगार संघटना यांच्या वतीने दि. १२ फेब्रुवारी रोजी गटविकास अधिकारी पंचायत समिती धामणगाव रेल्वे यांना निवेदन देण्यात आले. तसेच सदर विषयावर तोडगा न निघाल्यास आंदोलनात्मक पवित्रा घेण्याचा इशारा यावेळी करण्यात आला आहे.
निवेदन देतेवेळी गवंडी बांधकाम मजदूर युनियनचे तालुकाध्यक्ष मनोज सापेकर सचिव गौतम गजभिये श्रमिक इमारत इतर बांधकाम कामगार संघटना तालुका अध्यक्ष रेणुका सपाटे, आकाश ठवकर, गौतम सोनवणे, गजानन वानखडे, चंद्रपालजी रंगारी, मनोज चव्हाण, रामेश्वर बोरकर, तसेच इतर सदस्य उपस्थित होते.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!