धामणगाव रेल्वे

तळेगाव ग्रामपंचायत मध्ये अद्यापही सरपंच पती राजच !

आमसभा सुरु असताना ग्रामपंचायत मध्ये येउन सरपंच पतीचा राडा

धामणगाव रेल्वे

महिला सक्षमीकरण व्हावे यासाठी प्रत्येक क्षेत्रात महिलांना राखीव कोटा देण्यात आला आहे. त्यासाठी विविध योजनासुद्धा राबविण्यात येत आहे. मात्र तळेगाव दशासर ग्रामपंचायतीमध्ये अद्यापही सरपंच पतीराज असल्याचा अनुभव गावातील नागरिकांना येत आहे. झाले असे कि, आमसभा सुरु असताना तळेगाव दशासर ग्रामपंचायती मधील सरपंच यांचे पती प्रभाकर यादवराव ठाकरे यांनी प्रश्न विचारणाऱ्या नागरिकांवर दबाव टाकीत त्यांना बाहेर जाण्यास भाग पडले असल्याचा प्रकार आज दि. २३ मे रोजी घडला आहे.
तळेगाव दशासर ग्रामपंचायती ने आज रोजी आमसभा आयोजित केली असता आमसभेला नागरिक उपस्थित असून आपापली प्रश्न सचिव तसेच सरपंच यांच्यासमोर मांडत होती. मात्र मधातच सरपंच मीनाक्षी प्रभाकर ठाकरे यांचे पती तिथे येऊन नागरिकांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून त्याच्यावर दबाव टाकत नागरिकांना बाहेर जाण्यास सांगत होते. या विषयाचा एका नागरिकाने व्हिडिओ रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला असता त्याच्यावर सुद्धा दबाव टाकण्याचा प्रयत्न करीत असल्याचे केलेल्या चित्रफीत मधून समोर येत आहे.
एकीकडे राज्य शासनाची आमसभेचे रेकॉर्डिंग करण्याची परवानगी असताना सुद्धा अशाप्रकारे नागरिकांवर दबाव टाकण्याचे काम सरपंच पतीकडून केले जास्त असल्याचा धक्कादायक प्रकार तळेगाव दशासार येथे घडला आहे. त्यासंदर्भात नागरिकांनी गटविकास अधिकारी याना रीतसर तक्रार देऊन सरपंच तसेच सरपंच पतीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच ७ दिवसाच्या आत कारवाई न झाल्यास समस्त नागरिक आमरण उपोषणाला बसणार असल्याचे तक्रारीत नमूद आहे. तक्रारींवर सौ. भारती र चुटे, मनीष आर कुयटे, दिलीप पेंदाम, सौ, संगीत नंदकिशोर गवळी, संजय म सारवे, अमर भि. सुरजुसे सह अनेक नागरिकांच्या स्वाक्षरी आहे.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!