धामणगाव रेल्वे

तळेगाव दशासर ग्रा. प. भ्रष्टाचार विरोधात गावकरी बसले आमरण उपोषणावर

घरकुल, सिंचन विहीर, स्वच्छता भारत मिशन भ्रष्टाचार प्रकरण

धामणगाव रेल्वे – प्रतिनिधी

मागील अनेक दिवसापासून या ना त्या कारणाने चर्चेचा विषय बनलेल्या ग्रा. प. तळेगाव दशासर पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे. विविध योजनेमधून झालेल्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे असून त्याची चौकशी करून दोषी विरोधात कारवाई करण्यासाठी संपूर्ण गाव एकवटल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. ज्यामध्ये घरकुल, सिंचन विहीर, स्वच्छता भारत मिशन टप्पा १ चा समावेश आहे. या संदर्भात चौकशी करून कारवाई व्हावी म्हणून ठराव मंजूर असतानासुद्धा प्रशासनाने कुठल्याही प्रकारचे ठोस पाऊले न उचलल्याने शेवटी गावातील नागरिकांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपोसले आहे.

दि. १० जून पासून गावातील नागरिक जयस्तंभ चौक, स्टेटबँक जवळ आमरण उपोषणासाठी बसलेले आहे. या काळात गटविकास अधिकारी तसेच विस्तार अधिकारी यांनी उपोषणस्थळी भेट दिली असली तरी पूर्णपणे तोडगा न निघाल्याने उपोषणकर्ते उपोषणावर ठाम आहे. ज्यामध्ये अशोक धनजोडे, पुंडलिक बाबरे, रमेश ठवकर, शंकर शेलोकार, अविश कावळे, रवी कुकडे, संजय सारवे, सचिन भोयर, प्रवीण ठवकर, अमर सुरजुसे, शंकर शिरभाते इत्यादी उपोषणकर्त्याचा समावेश आहे.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!