धामणगाव रेल्वे शैक्षणिक

से.फ.ला. हायस्कूलच्या एन.सी.सी. ए – प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल १००%

धामणगाव रेल्वे – तालुका प्रतिनिधी

धामणगाव एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित सेठ फत्तेलाल लाभचंद हायस्कूल मधील सत्र २०२४ – २५, ८ महाराष्ट्र बटालियन अमरावती तर्फे आयोजित द्वितीय वर्ष एन.सी.सी. कॅडेट्स ए प्रमाणपत्र परीक्षा जानेवारी महिन्यात पार पडली. या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून परीक्षेमध्ये से. फ. ला. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी १००% यश प्राप्त केले आहे. या परीक्षेकरता विदयालयाचे शिक्षक व एन.सी.सी. सी.टी.ओ. प्रवीण पनपालिया यांचे उत्कृष्ट मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभले..
विद्यार्थ्यांच्या या यशाकरिता विद्यालयाचे प्राचार्य प्रशांत शेंडे, उपप्राचार्य प्रदीप मानकर,पर्यवेक्षक अनिल लाहोटी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या आहेत
मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!