धामणगाव रेल्वे

युवा पत्रकार संघटनेच्या दिनदर्शिकाचे उत्साहपूर्ण वातावरणात विमोचन

नगराध्यक्षा अर्चना अडसड ( रोठे ) व मुख्याधिकारी पूनम कळंबे यांच्या शुभहस्ते विमोचन

धामणगाव रेल्वे

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून युवा पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्य याच्या वतीने प्रकाशित करण्यात येत असलेल्या नवीन दिनदर्शिका विमोचन कार्यक्रम धामणगाव रेल्वे नगरपरिषद प्रांगणात मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. नवनिर्वाचित नगराध्यक्षा अर्चना अडसड ( रोठे ) अक्का व नगर परिषद मुख्याधिकारी यांच्या शुभहस्ते दिनदर्शिकेचे विमोचन करण्यात आले. या कार्यक्रमाला युवा पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय सायरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी नगराध्यक्ष अर्चना अडसड ( रोठे ) तसेच उपनगराध्यक्ष गिरीश उर्फ बंडू मुंदडा नगर परिषद मुख्याधिकारी पूनम कळंबे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दिनदर्शिकेचे औपचारिक विमोचन करण्यात आले.

कार्यक्रमा दरम्यान युवा पत्रकारांनी समाजहितासाठी निर्भीड व प्रामाणिक पत्रकारिता करीत पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम युवक पत्रकारांनी करावे असे मत युवा पत्रकार संघटनेच्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय सायरे यानी व्यक्त केले. तर नगराध्यक्ष अर्चना अडसड ( रोठे ) यांनी युवा पत्रकार संघटनेच्या कार्याचे कौतुक करीत संघटनेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच उपनगराध्यक्ष गिरीश उर्फ बंडू मुंदडा यांनी देखील पत्रकारितेच्या माध्यमातून लोकशाही अधिक बळकट होते असे मत आपल्या भाषणातून व्यक्त केले.
सदर युवा पत्रकार संघटना दिनदर्शिका विमोचन कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता युवा पत्रकार संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय सायरे, उपाध्यक्ष सचिन करडे, सचिव सुरज वानखडे, सदस्य हितेश गोरिया, सचिन ठाकूर पवन बहाळ, सचिन मून, अतुल भुजाडणे, सलमान फैय्याज खान, प्रशांत मून, गोपाल परडके, गजानन फिरके, अनिल शर्मा यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. यावेळी कार्यक्रमाला पत्रकार बांधव, नगरसेवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!