अमरावती – प्रतिनिधी
प्रियांसी राजू गवई, संत कबीर नगर अमरावती वर्ग ९ व्या मधील शिकत असलेली प्रियांसी गवई या विद्यार्थिनीला राष्ट्रसेवा सन्मान व वंदे भारत नॅशनल अवार्ड ने सन्मानित करण्यात आले आहे.

प्रियांसी ने ३६ ऑल इंडिया डान्स चॅम्पियनशिप, नॅशनल नृत्य स्पर्धा २०२३ हिमाचल प्रदेश, राष्ट्रस्तरीय लावणी स्पर्धा २०२४,विदर्भस्तरीय नूत्य स्पर्धा २०२३, जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धा २०२३ अशा विविध स्पर्धेमध्ये भाग घेऊन प्राविण्य कमावले. त्यामुळे ०१ एप्रिल २०२५ ला राष्ट्र सेवा सन्मान (भारत सरकार ) द फेअर विझन फाउंडेशन. फाउंडेर रवी वर्मा यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले तसेच वंदे भारत नॅशनल अवार्ड देण्यात आला.














Add Comment