राजकीय

प्रविण हेंडवे या सच्चा रूग्णसेवकाला निवडून देवुन मतदारसंघात परिवर्तन घडवा – बच्चू कडू

धामणगाव रेल्वे –

येथील विधानसभा मतदारसंघात सध्या महायुती, महाविकास आघाडी, महाशक्ती व वंचित यांचा मतदारसंघात मोठ्या जोमाशोमात प्रचार सुरू आहेत. अश्यातच महाशक्ती व प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार अधिकृत उमेदवार प्रविण हेंडवे यांना निवडून देण्याचे आवाहन प्रहार चे संस्थापक  बच्चु कडू यांनी मतदाराना केले आहेत. गेल्या २० वर्षापासून प्रहारशी प्रामाणिक असणाऱ्या व रूग्णसेवेच्या माध्यमातुन धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघात परिचित असलेल्या, समाजसेवेचा वसा घेतलेल्या या सामान्य कार्यकर्त्याला भरघोस मतांनी निवडून द्या अस आवाहन बच्चु कडू यांनी यावेळी केले.
              मतदारसंघातील प्रस्थापित राजकीय पक्षांच्या हुकुमशाहीतुन हा मतदारसंघ सोडून राजकीय परिवर्तन या ठिकाणी घडवा व प्रविण हेंडवे ला निवडून देऊन माझे हात बळकट करा अस आवाहन त्यांनी मतदारांना केले. बच्चु कडू यांच्या या आवाहनानंतर धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघात प्रहार ने प्रचारात जोरदार उसंडी घेतली असून येणाऱ्या २० तारखेला होऊ घातलेल्या निवडणूकीत ‘बॅट’ कुणा कुणाला मतदानरुपी फटके मारेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!