राजकीय

धामणगाव तालुक्यातील १२४ पांदण रस्त्याचे करारनामे रद्द ; प्रहारच्या आंदोलनाला यश, मात्र शेतकऱ्याच्या पदरी निराशाच

धामणगाव रेल्वे 

तालुक्यातील मंजूर असलेल्या २७५ पांदण रस्त्याचे काम ३ वर्षांपासून सुरु न झाल्याने शेतकऱ्यासमवेत प्रहार चे तालुकाप्रमुख सुरज गंथडे यांच्याकडून तहसील कार्यालयात २ जून रोजी ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. त्यादरम्यान तहसीलदार अभय घोरपडे आणि सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत संबंधित ठेकेदाराला ७ दिवसात कामे सुरु न केल्यास त्यांचे करारनामे रद्द करून त्यांना तालुक्यात कुठलेही कामे करता येणार नसल्याचे लेखी आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर प्रहारच्या आंदोलनाला मोठे यश मिळाले असून ठेकेदाराला देण्यात येणाऱ्या कामांमधून तब्बल १२४ पांदण रस्त्याचे करारनामे रद्द करण्यात आले आहे. अशा आशयाचे पत्र सार्वजनिक बांधकाम उपविभाग चे उप अभियंता बकाले यांनी काढले आहे. पत्रानुसार श्रीनिवास कन्ट्रक्शन चे नंदकिशोर जाधव औरंगाबाद यांच्याकडील १०७ पांदण रस्ते, एस. ए बिल्डर्स परतवाडा यांच्याकडील १० पांदण रस्ते तसेच श्रीकांत राजेंद्र काळे, परतवाडा यांच्याकडील ७ पांदण रस्त्याचे कामाचे करारनाने रद्द केले आहे.
प्रहरच्या आंदोलनामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून संबंधित ठेकेदाराला मोठा दणका मिळाला असला तरी शेतकरी अन्नदात्याच्या पदरी निराशाच पडली आहे. ज्यापद्दतिने निवडणुकांच्या तोंडावर मोठमोठे बोर्ड लावून शेत पांदण रस्त्याचे आमदाराच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. मात्र ३ वर्ष लोटूनही अद्याप शेतकऱ्याच्या वहिवाटीचा प्रश्न जशाच तसाच दिसून पडतो त्यामुळे शेतकऱ्याच्या तोंडाला पानेपुसून खोटी आश्वासने देऊन फक्त मतां साठीच त्याचा वापर केला जातो का हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

आमदार प्रताप अडसड यांनी मोठा गाजावाजा करीत पांदणरस्त्याचे उदघाटन करून शेतकऱ्यांना पांदण रस्ते करू म्हणून सांगितले मात्र महसूलमंत्री, मुख्यमंत्री सह सगळी यंत्रणा त्यांच्याकडे असूनसुद्धा शेतकऱ्यांना पांदण रस्त्यासाठी एवढा त्रास का – सुरज गंथडे प्रहार तालुका प्रमुख धा. रे.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!