धामणगाव रेल्वे

विध्यार्थ्यांना उद्भवणाऱ्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी प्रताप अडसड यांनी साधला मुख्यमंत्राशी संवाद

मईसीबी परीक्षेचे केंद्र दूर दिल्याने परीक्षा पुढे ढकलण्यासंदर्भात केली मागणी

धामणगाव रेल्वे

एमईसीबी परीक्षेबाबत विद्यार्थ्यांना भेडसावत असलेल्या अडचणींची गंभीर दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवरून आमदार प्रताप अडसड यांनी संपर्क साधून विद्यार्थ्यांच्या अडचणी मांडल्या दरम्यान याविषयी सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे आश्वासन फडणवीस यांनी दिले
परीक्षेसाठी अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या राहत्या ठिकाणापासून दूरवर परीक्षा केंद्र देण्यात आल्यामुळे प्रवास, निवास, आर्थिक अडचणी तसेच वेळेचे नियोजन यांसारख्या समस्या निर्माण झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून आमदार अडसड यांनी तातडीने मुख्यमंत्री फडवणीस यांच्याशी संवाद साधून विद्यार्थ्यांचा मुद्दा ठामपणे मांडला. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या सक्षम नसून अचानक दूरच्या केंद्रावर जाणे त्यांच्यासाठी आव्हानात्मक ठरत आहे. काही विद्यार्थ्यांना रात्रीचा प्रवास करावा लागणार असून, सुरक्षिततेच्या दृष्टीनेही चिंता व्यक्त केली जात आहे. तसेच सार्वजनिक वाहतुकीची मर्यादित उपलब्धता, अनियमित वेळापत्रक आणि वाढलेला खर्च या सर्व बाबी विद्यार्थ्यांसाठी अडथळा ठरत आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयावर सकारात्मक भूमिका घेत विद्यार्थ्यांच्या समस्या गांभीर्याने ऐकून घेतल्या. त्यांनी संबंधित विभागाशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेण्याचे आश्वासन दिले. विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य देत लवकरच योग्य तो निर्णय घेतला जाईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. विद्यार्थ्यांना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी शासन स्तरावर आवश्यक ती पावले उचलली जातील, असेही त्यांनी सांगितले.
आमदार प्रताप अडसड यांनीही विद्यार्थ्यांना धीर देत सांगितले की शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. कोणत्याही विद्यार्थ्याचे नुकसान होणार नाही, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले की, ज्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी दूरचे सेंटर आले आहे त्यांनी आपल्या सोयीनुसार परीक्षेसाठी जाण्याची तयारी ठेवावी. शासनाकडून निर्णय जाहीर होताच त्याबाबत अधिकृत माहिती दिली जाईल. विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न लक्षात घेता आमदार प्रताप अडसड यांच्या पुढाकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये दिलासा निर्माण झाला आहे. अनेक पालकांनीही या हस्तक्षेपाचे स्वागत केले आहे.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!