वरुड प्रतिनिधी – निलेश निंबाळकर
वरुड तालुका व नगर परिषद हद्दीतील नागरिकांचे प्रश्न प्रलंबित असून, वारंवार तहसील कार्यालयात निवेदन दिल्यानंतरही कुठलीच ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. २०/०८/२०२५ व १४/०७/२०२५ रोजी निवेदनाद्वारे सविस्तर माहिती देऊनही प्रशासनाने केवळ वेळकाढूपणा केला आहे. त्यामुळे येत्या दि. १६ सप्टेंबर २०२५ रोजी मंगळवारपासून तहसील कार्यालय, वरुड येथे आक्रोश जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष सुशिल बेले आमरण उपोषणास बसणार आहेत.














Add Comment