धामणगाव रेल्वे

शंकर पटाच्या कारभाऱ्यांचे हात वर ; पत्रकारांच्या प्रश्नांवर आयोजक निरुत्तर

भुरट्या पत्रकारांच्या बातम्यांशी संबंध नसल्याची कबुली ; पत्रकार संघटनेकडून कारवाईची मागणी

धामणगाव रेल्वे 

      तालुक्यातील तळेगाव दशासर येथील शंकर पटात पत्रकारांच्या प्रश्नावर कृषक सुधार मंडळ रविवारी (ता. १८) ला निरुत्तर ठरले. दरम्यान पत्रकारांच्या गळचेपी व दडपशाहीवर मंडळाने हात वर केले आहे. त्या भुरट्या पत्रकारांशी व निषेध व्यक्त करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीशी आमचा संबंध नाही असे अस्थिर उत्तरे यावेळी उपस्थित पत्रकारांना देण्यात आली.
शंकर पटातील अव्यवस्था व संशयित अर्थकारणाच्या बातम्या प्रसार माध्यमांकडून चव्हाट्यावर आल्या आहेत. माध्यमांवर संबंधीत बातम्यां प्रकाशित होताच कृषक सुधार मंडळात आर्थिक गैरव्यवहाराचा संशय व्यक्त केला जात होता. अर्थार्जनाच्या गंभीर बाबी चव्हाट्यावर येऊ नये यासाठी बातम्यांचे सत्य दडपण्याच्या प्रयत्नात एका भुरट्या पत्रकाराला हाताशी धरून तळेगाव दशासर शंकर पटात काहींनी माध्यमांवर आलेल्या बातम्या चुकीच्या ठरविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला होता. वास्तविकतेवर पांघरून घालण्यासाठी पत्रकारांवर दबावतंत्र वापरून “सत्य झाकण्याचा आटोकाट प्रयत्न” कृषक सुधार मंडळाने केला होता. मात्र पत्रकारांनी सदर बाब संघटनेच्या निदर्शनास आणून दिली असता पत्रकार संघटनेच्या वतीने तळेगाव दशासर कृषक सुधार मंडळाला भेट देण्यात आली. यावेळी आम्ही पत्रकरांचा कोणताही निषेध केलेला नाही व निषेध नोंदवणाऱ्या व्यक्तिशी आमचा कुठलाही संबंध नाही व त्या भुरट्या पत्रकाराला आम्ही ओळखत सुद्धा नाही इत्यादी अस्थिर उत्तरे देण्यात आली.
यावेळी सदरचे प्रकरण अत्यंत गंभीर असल्याने धामणगाव पत्रकार संघटनेच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून पत्रकारांवर दबाव आणून स्वतःचे उखळ पांढरे करणाऱ्या कृषक सुधार मंडळाच्या चौकशीची मागणी जिल्हाधिकारी व संबंधित विभागाला करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी मराठी पत्रकार संघटनेचे सचिव मंगेश भुजबळ यांनी दिली आहे. तर संपूर्ण कृषक सुधार मंडळ यांच्या आर्थिक चौकशीचा पाठपुरावा करणार असल्याचे मत युवा पत्रकार संघटनेचे सचिव सुरज वानखडे यांनी व्यक्त केले. सदर प्रकरणात पत्रकारांच्या अभिव्यक्तीवर गदा आणणाऱ्यावर फौजदारी कारवाईची तक्रार तळेगाव पोलिसात करण्यात आली आहे. एकंदरीत संपूर्ण प्रकरणात कृषक सुधार मंडळाचे अर्थकारण दडले असल्याच्या बातम्यांची सत्यताच समोर आली असून चौकशीतून मोठे खुलासे होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अन् म्हणे आमदारांना श्रेय का द्यायचे

पत्रकारांनी अर्थकारणाच्या मुद्द्यावर बोट ठेवताच कृषक सुधार मंडळाने उडवाउडवीची व जनतेची दिशाभूल करणारी उत्तरे देऊन टाळाटाळ केली. घटनेत पोलीस व पट कमिटी यांच्या वादात समन्वय साधण्याचा प्रामाणिक प्रयत्न आमदार प्रताप अडसड यांनी केला होता मात्र आमदाराला श्रेय का द्यायचे हा विषय डॉ. देशमुख  यांच्याकडून जाणीवपूर्वक समोर आल्याने या प्रकरणी राजकीय चढाओढीत शंकरपट गुरफटला असल्याचे सुद्धा दिसून आले.
सदर सपूर्ण प्रकरणाचा निषेध व्यक्त करतेवेळी मराठी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष पवन शर्मा सचिव मंगेश भुजबळ, बोधिसत्व काळे, वरिष्ठ पत्रकार हाफिज भाई, युवा पत्रकार संघटनेचे सचिव सुरज वानखडे, सदस्य हितेश गोरिया, पवन बहाळ, सलमान खान, गजानन फिरके प्रामुख्याने उपस्थित होते..
मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!