धामणगाव रेल्वे

कृषक सुधार मंडळाकडून दडपशाहीची धडपड ; अर्थकारणाच्या सत्यावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न ?

भुरट्यांना सोबत घेऊन प्रचाराचा फ़ंडा

धामणगाव रेल्वे प्रतिनिधी

तळेगाव दशासर येथील कृषक सुधार मंडळाच्या हिंद केसरी शंकर पटाच्या पहिल्याच दिवशी कृषक सुधार मंडळाची अव्यवस्था व अर्थकारण चव्हाट्यावर येताच मंडळाकडून ‘चोरांच्या उलट्या बोंबा’ सुरू झाल्या असून भुरट्यांना हाताशी घेऊ जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
१५१ वर्षांची परंपरा लाभलेल्या ऐतिहासिक शंकर पटात विदर्भासह मध्यप्रदेश, मराठवाडा, छत्तीसगढ व राज्यातील विविध भागातून पट शौकिनांची हजेरी लागते. हजारोंच्या संख्येत शेतकरी, नागरिकांची गर्दी या शंकरपट यात्रा महोत्सवात होते. दरम्यान यात्रेत झुले, खेळणी, शेती साहित्य व इतर असंख्य दुकाने याठिकाणी लागतात. कृषक सुधार मंडळाकडून या शेकडो दुकानांना भाडेपट्टयाच्या रक्कमेवर परिसरातील आखलेली जागा दिले जाते ही वास्तविकता आहे. परंतु जास्त लालचेपोटी पटात होणारी यात्रेकरूंची गर्दी व संभाव्य धोका न जुमानता ही दुकाने उभारून कृषक सुधार मंडळाकडून अर्थकारण होत असल्याचा संशय पहिल्याच दिवशी घडलेल्या एका घटनेतून व्यक्त केला जात होता. सदर बातम्या माध्यमांनी प्रकाशित करताच कृषक सुधार मंडळाची आपल्या अर्थकारणाच्या सत्यावर पांघरूण घालण्याची धडपड सुरू झाली आहे.

उद्घाटनाच्या दिवशी नको त्या ठिकाणी लागलेल्या दुकानांच्या कारणावरून कृषक सुधार मंडळ व तळेगाव दशासर पोलीसात मतभेद निर्माण झाले होते. या विवादात तब्बल दोन तास शर्यत बंद ठेवण्यात आली होती व चक्क भोंग्यात घोषणा करण्यात आली. दरम्यान काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी उपस्थित हजारो लोकांना घडलेला प्रकार अवगत झाला असतांना कृषक सुधार मंडळाला बैलगाडा शर्यतीसाठी दुकानाचे अर्थकारणात महत्वाचे असल्याचे सुद्धा समोर आले होते. दरम्यान उपस्थित मान्यवरांनी समन्वय साधल्याने पट पुन्हा सुरू करण्यात आला होता. पटाच्या उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी आयोजक कृषक सुधार मंडळाची अव्यवस्था चव्हाट्यावर आल्याने माध्यमांनी घडलेली वास्तविकता मांडली. मात्र बातम्या प्रकाशित होताच कृषक सुधार मंडळाकडून दडपशाहीचा उपयोग केला जात असून घटनेपेक्षा मंडळाचे अर्थकारण कृषक सुधार मंडळाच्या चांगलेच जिव्हारी लागले आहे. संशयित बाबी समोर येताच मंडळाकडून सदर विषयांवर पांघरून घालण्याची धडपड केली जात आहे. दरम्यान एका भुरट्या पत्रकाराला सोबत घेऊन सत्य मांडणाऱ्या प्रसारमाध्यमांची गळचेपी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ज्याच्या हातात शेण, तेच स्वच्छतेचे धडा देतांना दिसून येत असल्याने कृषक सुधार मंडळाच्या अर्थकारणात नेमकं दडलंय तरी काय ? या प्रश्नांना आता तोंड फुटू लागले आहे. प्रसारमाध्यमांनी आर्थिक बाबींबाबत वास्तव मांडण्याचा प्रयत्न केल्याने प्रसारमाध्यमांना लक्ष्य करून निषेधात्मक बातम्या प्रसारित करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात आहे.

तथापि घटनेची खरी माहिती जनतेसमोर असून सत्य लपवता येत नाही, अशी प्रतिक्रिया नागरिक व पट प्रेमींमधून व्यक्त होत आहे.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!