सध्यस्थित श्रावण बाळ, संजय गांधी योजनेचे अनुदान हे डीबीटी मार्फत थेट लाभार्थ्यांच्या खात्यात येत आहे मात्र अनेक लाभार्थ्यांची केवायसी अपडेट तसेच आधार लिंक नसल्याने लाभ मिळण्यास अडचणी निर्माण होत आहे. त्यामुळे वारंवार लाभार्थ्यांना तहसील कार्यालयात चकरा माराव्या लागत आहे. तर अनेकांनी बँक मध्ये जाऊन केवायसी तसेच आधार लिंक करून सुद्धा जानेवारी २५ ते एप्रिल २५ पर्यंत ४ महिन्याचे अनुदान लाभार्थ्यांना मिळाले नाही. त्यामुळे अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे.
या संदर्भात तहसील कार्यालयातील अधिकारी याना विचारणा केली असता या योजनेचे अनुदान शासनामार्फत थेट लाभार्थ्यांच्या खात्यात येत असल्याने आमच्या हातात काहीही नाही. आम्ही फक्त लाभार्थ्यांना लाभ मिळण्यासाठी ज्या अडचणी येत आहे ते सांगू शकतो. तर ज्यांची केवायसी आणि आधार लिंक आहे त्यांना मे आणि जुन महिन्याचा लाभ मिळाला असल्याचे सांगण्यात आले.
तालुक्यात ९०३ लाभार्थ्यांच्या केवायसी सह आधार लिंक नसल्याने त्यांना लाभ मिळाला नाही, त्याकरिता संबंधित तलाठी याना गावनिहाय यादी देऊन लाभार्थ्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी पत्र दिले आहे – वसंत पखाले – नायब तहसीलदार, धामणगाव रेल्वे
Add Comment