धामणगाव रेल्वे

धामणगाव बाजार समितीमध्ये नवीन तूर खरेदीला सुरुवात : शेतकऱ्याला ८१११ रुपये प्रति क्विंटल मिळाला भाव

माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या हस्ते शुभारंभ

धामणगाव रेल्वे:प्रतिनिधी 

स्थानिक बाजार समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज बाजार आवारामध्ये नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर शेतकऱ्यांना आनंदाची बातमी मिळाली असून नवीन तूर खरेदीला सुरुवात झाली आहे. नवीन वर्षालाच माजी आमदार विरेंद्र जगताप यांच्या शुभहस्ते तुर खरदीच्या शुभारंभ करण्यात आला असून ८१११ रुपये प्रती क्विंटल भाव मिळाला आहे.
तुर खरेदीच्या शुभारंभ प्रसंगी आडते मुकेश पंनपालिया दिपक राजनकर यांच्या आडत मध्ये तरोडा येथील शेतकरी अरुण कुकडे तर आडते मनीष केला यांच्या खरेदी मध्ये शेतकरी गजानन हटवार यांच्या तुरीला ८१११ रु भाव मिळाला मिळाला. त्याकरिता माजी आमदार प्रा. विरेंद्र जगताप यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन शेतकरी बंधुचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला समितीच्या सभापती कविता श्रीकांत गावडे यांनी महापुरुषाच्या च्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी माजी आमदार विरेंद्र‌ जगताप अध्यक्षीय भाषणात म्हणाले की जेव्हा शेतातून शेतमाल निघतो तेव्हा शेतमालाला योग्य भाव मिळाला पाहिजे परंतु शासन शेतमाल आयात करते त्यामुळे योग्य भाव मिळत नाही गेल्या एक दोन वर्षात नैसर्गिक आपत्तीमुळे खूप नुकसान झाले आहे यावर्षी उत्पन्न बऱ्यापैकी वाटते शेतमालाला योग्य भाव मिळाला पाहिजे. शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे भाव मिळत नाहीं आडते व व्यापारी शेतकरी बंधुचे दुश्मन नाही वरून भावच नससल्या मुळे ते काय करणार याला जबाबदार शासन आहे, असे मत त्यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले. तसेच समितीच्या सभापती सौ कविता श्रीकांत गावंडे यांनी नववीन वर्षाच्या शेतकरी, आडते, व्यापारी, मापारी, हमाल, मदतनीस बंधूंना नवीन वर्षाच्या शुभेच्या देऊन आपला शेतमाल बाजार समिती मध्ये किंवा शासनालाच विक्री करावा असे आवाहन केले.
सदरच्या कार्यक्रमात प्रामुख्याने जिल्हा बँकेचे संचालक श्रीकांत गावंडे खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष बबनराव मांडवगणे, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष पंकज वानखडे, समितीच्या उपसभापती सौ संगीता गाडे, तसेच संचालक राधेश्याम चांडक गिरीश भुतडा, मंगेश बोबडे, मुकुंद मोहोरे, विपिन ठाकरे, भाऊराव बमनोटे, विलास भील, संजय गाडे, संजय धामंदे, अवीन टेकाडे, आशिष शिंदे, मुकेश राठी, सुनील भोगे सतीश मोकाती, बाजार समितीचे व्यापारी मनीष केला, संजय अग्रवाल, अबू अग्रवाल, प्रदीप कुचेरिया, राजेश गगण, कैलास राठी सचिन गागण, प्रेमकुमा टावरी, सचिन मुंदडा नंदलाल राठी, पवन लाहोटी, गोवर्धन राठी, गणेश पानपालिया, संतोष लाहोटी, सुरेंद्र जयस्वाल, दीपक राजनकर, गोवर्धन राठी मुकेश पनपालिया, रितेश राठी, आशू कापसे, मधुर राठी, प्रदीप राठी, अमोल हटकर, हमाल मापारी मदतनीस बंधू तसेच बाजार समिती कर्मचारी दिनेश गोमासे, संजय तुपसुंदरे, नितीन मांडवगणे, पवन श्रीखंडे, आदी उपस्थित होते.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!