महाराष्ट्र शैक्षणिक

प्रफुल्लित केंद्राचा कै.मीनाताई ठाकरे विद्यालयात स्तुत्य उपक्रम

विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी डॉ. प्रफुल्ल पाटील यांच्याकडून शाळेला पंखे भेट

कोल्हापूर प्रतिनिधी

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून प्रफुल्लित केंद्रामार्फत क्रांतिसिंह नाना पाटील नगर परिसरातील कै. मीनाताई ठाकरे विद्यालयात एक प्रेरणादायी आणि सामाजिक जाणिव जपणारा उपक्रम पार पडला. याप्रसंगी प्रफुल्लित केंद्राचे संस्थापक आणि विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. प्रफुल्ल पाटील यांनी संवेदनशीलतेचे दर्शन घडवत शाळेला दोन सीलिंग फॅन तत्परतेने भेट दिले, प्रफुल्ल पाटील हे एका कार्यक्रमानिमित्त शाळेत आले असता, उन्हाच्या कडाक्यामुळे विद्यार्थ्यांना व शिक्षकांना सहन करावा लागणारा त्रास त्यांनी प्रत्यक्ष पाहिला. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारी अस्वस्थता आणि वर्गातील उकाडा पाहून त्यांनी तात्काळ शाळेला सीलिंग फॅन देण्याची घोषणा केली. घोषणा करून थांबण्याऐवजी त्यांनी लगेचच त्याची अंमलबजावणी करत आज शाळेला दोन सीलिंग फॅन भेट दिले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना उकाड्यापासून दिलासा मिळणार असून शिक्षणासाठी अधिक आरामदायी वातावरण तयार होणार आहे.

या प्रसंगी डॉ. प्रफुल्ल पाटील म्हणाले की,“प्रफुल्लित केंद्राचा मुख्य उद्देश मुलांना शिकण्यासाठी प्रेरित करणे आणि त्यांची गुणवत्ता वाढवणे हा आहे. प्रत्येक मुलामध्ये काही ना काही विशेष प्रतिभा असते. ती शोधून तिच्यावर लक्ष केंद्रित करून त्या मुलाला योग्य संधी आणि पाठबळ दिले पाहिजे.” यावेळी शाळेचे मुख्याध्यापक संदीप सातपुते सर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “बोलणारे अनेक असतात, पण इतक्या तत्परतेने कृती करणारे फारच कमी असतात. विद्यार्थ्यांना व शिक्षकांना होणारा उकाड्याचा त्रास कमी व्हावा आणि शिक्षणासाठी आनंददायी वातावरण तयार व्हावे या उद्देशाने दिलेले हे फॅन नक्कीच उपयुक्त ठरतील.” असे म्हणत त्यांनी प्रफुल्लित केंद्राचे आभार मानले.या कार्यक्रमात प्रफुल्लित केंद्राच्या अध्यक्षा डॉ. अल्फिया बागवान यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल मिळालेल्या ‘पद्मश्री ग्लोबल एक्सलन्स नॅशनल अवॉर्ड’बद्दल शाळेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
या प्रेरणादायी कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन संचालिका रेश्मा काटकर यांनी केले. तर, शाळेतील विद्यार्थ्यांनी अत्यंत गोड शब्दांत उपस्थितांचे आभार मानले. याप्रसंगी बिस्मिल्ला नदाफ, जहिदा मुल्ला, राणी पाटील, माधुरी पाटील, सुनीता माने, शुभांगी पाटील, शाळेतील सर्व शिक्षकवृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!