धामणगाव रेल्वे

मनुवादी प्रवृत्तीचा वकील राकेश किशोरचा धामणगावात सर्वपक्षीयांकडून निषेध

CJI भूषण गवई यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध ; कठोर शिक्षा करण्याची विविध पधाधिकाऱ्याकडून मागणी

धामणगाव रेल्वे

गेल्या काही दिवसापूर्वी देशाच्या सर्वोच्च पदाची गरिमा असणारे CJI भूषण गवई यांच्यावर सुप्रीम कोर्टात एका प्रकरणाची सुनावणी सुरु असताना मनुवादी विचार सरणीचा वकील राकेश किशोर यांच्याकडून हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला असून सनातन धर्म का अपमान नही सहेंगे अशा घोषणा देण्यात आल्या. वेळीच सुरक्षारक्षकडून मध्यस्थी केल्यानी पुढील अनर्थ टळला. सदरची घटना अतिशय निंदनीय असून संपूर्ण देशाला काळिमा फासण्याचे काम या शिकलेल्या पण न पिकलेल्या वकिलामार्फत करण्यात आला. त्यामुळे सदरच्या प्रकरणाचे संपूर्ण देशात प्रतिसाद उमटले असून विविध ठिकाणी निषेध नोंदवण्यात आला. तर खास करून या माथेफिरू वकिलाचा विविध वकील संघाकडूनच एक दिवसीय काम बंद आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला.

अशातच धामणगाव रेल्वे येथे सुद्धा विविध पक्षाकडून एकत्रित येत झालेल्या घटनेच्या निषेधार्थ राकेश किशोर यांच्या प्रतीकात्मक पुतळा जाळून निषेध नोंदविण्यात आला. दि. ०९ ऑक्टोबर २५ रोजी सायंकाळी ६ च्या सुमारास सर्व पक्षीय पदाधिकारी नगरपरिषद प्रांगणात एकत्रित येत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हारार्पण करून मनुवादी विचारसरणी असलेल्या राकेश किशोर या वकिलाचा पुतळ्याचे दहन करून घोषणा देण्यात आल्या.
प्रामुख्याने या निषेधात पुरुष वर्गासह महिलांचा देखील समावेश होता हे विशेष….
मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!