तरोडा येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत कपडे वितरण
धामणगाव रेल्वे- ता.८:-
जागतीक महिला दिनानिमित्त येथील माहेश्वरी महीला मंडळ व तालुका माहेश्वरी संघटनेतर्फे विभागीय स्पर्धेत धावपट्टी गाजविणाऱ्या महीला गट विकास अधिकारी माया वानखडे यांचा गौरव करण्यात आला. सामाजिक व सेवाभावी उपक्रम म्हणून तरोडा येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत कपडे वितरित करण्यात आले. या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
माहेश्वरी महीला मंडळ व तालुका माहेश्वरी महिला संघटनेचा उपक्रम
तालुक्यातील तरोडा येथील सर्वेश्वर हनुमान मंदिराच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीच्या सभापती बेबी उईके ह्या होत्या.तर प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समितीचे सदस्य राजकुमार केला,पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी माया वानखडे, गटशिक्षणाधिकारी संदीप बोडखे, माहेश्वरी महिला मंडळाच्या अध्यक्ष सारिका राठी, धामणगाव तालुका माहेश्वरी महिला संघटनेच्या अध्यक्ष उषा राठी,तालुका माहेश्वरी संघठनेचे अध्यक्ष मुकेश राठी, माहेश्वरी हितकारक संघाचे अध्यक्ष अनिल पनपालीया, माजी अध्यक्ष व पत्रकार मनिष मूंधड़ा, विशाल गांधी, सुभाष मुंदडा, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामेश्वर शेंद्रे, शिक्षण विस्तार अधिकारी दिवाण, केंद्रप्रमुख जगदीश कुमार शिरसाट व आदी प्रामुख्याने उपस्थित होते.














Add Comment