धामणगाव रेल्वे प्रशासन कार्यवाही

जनसूर्या न्यूज इम्पॅक्ट ; पोलीस प्रशासन ऍक्शन मोडवर ; सातत्याने दंडात्मक कारवाई सुरु

पोलिसांकडून रस्त्यावर बेशिस्त, बेजाबदारपणे वाहने उभी करणाऱ्या व वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्यावर कारवाईचा बडगा

धामणगाव रेल्वे

“मुख्य रस्त्यावरील वाढते अतिक्रमण जनतेसाठी डोकेदुखी” या हेडलाईन खाली जनसूर्या न्युज ने बातमी प्रकाशित केले होती. त्यावर पोलीस प्रशासन ऍक्शन मोडवर आली असून धामणगावात कालपासूनच सातत्याने कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. ठाणेदार गिरीश ताथोड यांच्या नेतृत्वाखाली सहा. पो. निरीक्षक गजानन गजभाये आपल्या टीम सह स्वतः रस्त्यावर उतरून दुकानासमोरील वाढलेल्या अतिक्रमणामुळे बेजाबदारपणे रस्त्यावर वाहने लावणाऱ्या तसेच वाहतूक नियमाचे पालन न करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करीत आहे. त्यामुळे रस्ता आपल्या बा… चा समजून कुठेही वाहने उभी करणाऱ्यांना चांगलीच चपराक बसत आहे. आपल्या दुकानासमोर बेशिस्तपणे वाहने उभे करीत असल्याने दुकान मालकांनासुद्धा पोलीस प्रशासनाकडून चांगला समज यावेळी देण्यात येत आहे.

बेजबाबदारपणे रस्त्यावर वाहने उभी करणाऱ्यावर कारवाई करताना पोलीस प्रशासन 

सदरच्या कारवाईत ज्यांना दंड बसला त्यांच्याकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे तर सुजाण नागरिकांकडून जोपर्यंत दुकान मालकांना तसेच वाहन धारकांना शिस्त लागत नाही तोपर्यंत सदरची कारवाई सुरूच ठेवावी अशी मागणी करण्यात येत आहे. तर पोलीस प्रशासनाकडून सुद्धा बेजाबदारपणे वागणाऱ्या, बेशिस्तपणे कुठेही वाहने उभे करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे. कारवाई करतेवेळी सहा. पो. निरीक्षक गजानन गजभाये, पो. उप. निरीक्षक पुंडलिक चव्हाण हेड कॉन्स्टेबल भाऊराव कामडी, रवींद्र पाखरे, राम सोडके उपस्थित होते.

सुजान नागरिक म्हणून पोलीस प्रशासनाला  सहकार्य करणे महत्वाचे असून यापुढेही पोलीस प्रशासनाची कारवाई व खाकीचा धाक असणे महत्त्वाचे आहे – संजय सायरे, अध्यक्ष युवा पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्य.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!