धक्कादायक धामणगाव रेल्वे

जळगाव आर्वी लगतच्या मुख्य कालव्यात आढळला ३६ वर्षीय अपंग युवकाचा मृतदेह

आत्महत्या कि, घातपात अद्याप अस्पष्ट ; मृतदेह ग्रामीण रुग्णालयात

धामणगाव रेल्वे

दि. ५ डिसेंबर २५ रोजी सकाळी १० च्या सुमारास शेतकरी नरेश गावंडे यांना गंगाजळी शेत शिवारातील अप्पर वर्धाच्या मुख्य कालव्यात मृतदेह तरंगताना दिसून आल्याने एकच खळबळ उडाली. सदर घटनेची माहिती दत्तापूर पोलीस प्रशासनाला देण्यात आली असता ठाणेदार गिरीश ताथोड यांच्या सह कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. कालव्यात पाण्याचा प्रवाह जास्त प्रमाणात असल्याने मृतदेह काढण्यात मोठी कसरत करावी लागली. मात्र दत्तापूरचे एपीआय गजानन गजभारे यांनी मोठ्या शिताफीने साहेबराव भोसले जळगाव आर्वी यांच्या शेतालगत असलेल्या कालव्यात उतरून मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर मृतदेहाची ओळख पटली असून मृतक गजानन प्रल्हाद गडलिंग, वय- ३६ वर्ष, रा. तरोडा येथील असल्याचे निष्पन्न झाले.
सदरची माहिती मृतकाच्या नातेवाईकांना देण्यात आली असून मृतकाचा भाऊ हा दिल्ली येथे राहत असल्याने मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. यावेळी प्रामुख्याने दत्तापूरचे ठाणेदार गिरीश ताथोड, एपीआय गजभारे, बिट जमादार दीपक पंधरे, अभय जाधव, शेतकरी नरेश गावंडे हे उपस्थित होते..
अपंग युवकाचा मृतदेह कालव्यात आढळून आल्याने सदरची घटना आत्महत्या कि, घातपात अद्याप कळू शकले नाही. प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार गिरीश ताथोड यांच्या मार्गदर्शनात दत्तापूर पोलीस करीत आहे..
मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!