धामणगाव रेल्वे सामाजिक

जिवक बौद्ध विहार येथे भारतीय बौद्ध महासभेची बैठक संप्पन्न

धामणगाव रेल्वे

भारतीय बौद्ध महासभेची मधली बैठक बुद्ध विहार पुष्पकरणा नगर, धामणगाव रेल्वे येथे दिनांक २८ सप्टेंबर २०२५ रोजी रविवार ला संपन्न झाली. भारतीय बौद्ध महासभा अमरावती येथील मान्यवर मार्गदर्शन करण्यासाठी विभागीय प्रभारी अनिल वानखडे ( कृर्षी अधिकारी ) जिल्हा अध्यक्ष सिध्दार्थ मुंद्रे, सुखदेव इंगोले, माजी पि. एस. आय. सतिष प्रधान, दहीले सर उपस्थित होते. तर त्यांनी भारतीय बौद्ध महासभेची १० उदिष्ट सांगितले
बि. आर. आंबेडकर मल्टी स्टेट बँकेची शेअर होल्डर विषयी मार्गदर्शन केले. कुंभारे सर व नगराळे सर यांनी बॅकेची शेअर घेऊन शेअर होल्डर बनले. तसेच संजय भगत यांची जिल्हा कोषाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. तर हरीदास डबले यांची तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष जिवक बुद्ध विहार चे सचिव सुधीर नगराळे उपस्थित होते. संजय भगत यांनी संचालन केले तर आभार प्रदर्शन चंद्रपाल रंगारी यांनी केले.
या कार्यक्रमाला चंद्रपाल रंगारी, सुनील पाटील, वसंत मेंढे, प्रकाश ढानके, निरंजन शेंडे, विजय भगत, लोणारे सर, टोकसे सर, सौ. सत्यभामाताई वानखडे, सौ. प्रज्ञाताई भगत, सौ. वंदनाताई दहा, सौ. रंजना ताई ढानके, सौ. मंदा ताई बारसे सह असंख्य बौद्ध उपासक उपासिका हजर होते.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!