धामणगाव रेल्वे

धामणगाव तालुक्यात पुन्हा अल्पवयीन मुलींचा विनयभंग ; तर दुसरीकडे विवाहित महिलेला शारीरिक संबंधाची मागणी

विनयभंगाचे वाढते प्रमाण ठरताहेत धोकादायक !

धामणगाव रेल्वे

दोन दिवसापूर्वी रेल्वे गेट परिसरात एका अल्पवयीन शाळकरी मुलीच्या विनयभंगाची घटना ताजी असतानाच तालुक्यात पुन्हा दोन वेगवेगळ्या ठिकाणी विनयभंगाच्या घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

एकीकडे १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या मैत्रिणींसह कॉलेज मध्ये जात असताना मागील १ महिन्यापासून तिचा पाठलाग करीत असताना दि. ३० जुलै रोजी सकाळी ८ ते ८:३० च्या दरम्यान दोन आरोपीयांनी त्यांच्याकडील असेलेल्या मोटारसायकल ने कट मारून पुढे थांबत वाईट इशारे करीत होते. सदरचा प्रकार पीडितेने आई वडिलांना सांगितल्याने त्यांनी तातडीने दत्तापूर पोलीस गाठत दोन्ही आरोपी विरोधात तक्रार नोंदविली. तक्रारीनुसार दत्तापूर पोलिसांनी आरोपी सलमान शेख वय १९ वर्ष, असिफ शेख वय २० वर्ष यांच्यावर बिएनएस कलम ७८, ७९ सह पॉक्सो कलम १२ अन्वये गुन्हा नोंद करून तपासात घेतला आहे.

तर दुसरीकडे तालुक्यातील मंगरूळ दस्तगीर पोलीस स्टेशन हद्दीतील एका २५ वर्षीय विवाहित महिलेंचा तिच्याच घरात येऊन शारीरिक संबंधाची मागणी केल्याप्रकरणी आरोपी शैलेश मोहन इंगळे वय- २४, रा, बोरगाव धांदे ता. धामणगाव रेल्वे याच्यावर मंगरूळ पोलीस स्टेशन येथे बीएनएस कलम ७५, (१) (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तपासात घेतला आहे.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!