धामणगाव रेल्वे सामाजिक

मानवता बुद्ध विहारातील ५ दिवसीय कार्यक्रमाचा समारोप

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १३४ व्या जयंती निम्मित विविध कार्यक्रमाचे केले होते आयोजन

धामणगाव रेल्वे 

आठवडी बाजार परिसर येथील मानवता बुद्ध विहारात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १३४ व्या जयंती निम्मित ५ दिवसीय विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये विद्यार्थ्यांचा वयोगटानुसार चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, मनोरंजनात्मक खेळाचा समावेश होता.

सर्वप्रथम १४ एप्रिल च्या सकाळी सर्वानी एकत्रितपणे येत सामूहिक बुद्धवंदना घेत महामानवाला मानवंदना दिली. त्यानंतर विहारापासून ते नगर परिषद येथे असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यापयंत रॅलीचे आयोजन केले होते. यावेळी सर्वानी अतिशय शिस्तबद्ध पद्दतीने डीजे ढोल ताशाच्या गजरात रॅलीचा आनंद घेतला.

१५ एप्रिल रोजी साय. ५ वाजतापासून ५ ते ७ आणि ८ ते १० वयोगटामध्ये चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली असून त्यात झाडे लावा झाडे जगावं आणि स्वच्छ भारत अभियान हा विषय देण्यात आला होता. त्यांनतर मनोरंजनात्मक खेळ घेण्यात आला. १६ एप्रिल रोजी निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये ५ ते ७ मधील विध्यार्थ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन व कार्य आणि मोबाईलचे फायदे व तोटे, तसेच ८ ते १० मधील विध्यार्थ्यांना ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचे जीवन कार्य आणि कोरोना चे दुष्परिणाम या विषयावर विध्यार्थ्यांना उत्कृष्ट असे निबंध लिहले. १७ एप्रिल रोजी सायंकाळी ६ ते ९ पर्यंत मनोरंजनात्मक खेळ घेण्यात आला तर १८ एप्रिल रोजी सर्व स्पर्धेतील विध्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. चित्रकला स्पर्धेमध्ये ५ ते ७ या वयोगटातील अनिष्का राऊत प्रथम क्रमांक, समृद्धी राऊत द्वितीय क्रमांक, तक्षवी भैसारे हिला तृतीय क्रमांक देण्यात आले. तर वयोगट ८ ते १० मध्ये प्रथम क्रमांक आमुली टेंभुर्णी, द्वितीय क्रमांक लक्ष राऊत, तृतीय क्रमांक गौरव रोकडे यांना देण्यात आले. तसेच निबंध स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक अमोली टेंभुर्णी, द्वितीय क्रमांक अनिष्का राऊत, तृतीय क्रमांक समृद्धी राऊत यांना देण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाची सुरुवात वैदेही राऊत हिने केली असून कार्यक्रमाचे बक्षीस वितरण दीपक रंगारी यांच्या हस्ते करण्यात आले. तर यामध्ये पंचशील नवयुवक मंडळ व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती व सर्व भीम अनुयायांच्या उपस्थित पार पडला.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!