धामणगाव रेल्वे

अपघातग्रस्त युवकाला प्रशांत नाईक यांचा मदतीचा हात

वंचित चे तालुकाध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या मदतीने जखमी युवक तातडीने रुग्णालयात रवाना

धामणगांव रेल्वे

तालुक्यातील पुलगाव ते मंगरूळ द. समृद्धी पुलाजवळ अंजनसिंगी येथील युवक पवन अशोक परिसे अंदाजे वय २८ रा अंजनसिंगी हा संध्याकाळी ८ वाजताच्या सुमारास आपल्या दुचाकीने घराकडे जात असताना गाडी स्लिप होऊन गंभीररित्या जखमी अवस्थेत अपघात स्थळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या असल्याची माहिती प्रशांत नाईक यांना मिळाली.
त्यांनी क्षणाचाही विलंब न करता मोहन राऊत, गणेश डगवार यांना सोबत घेऊन ताबडतोब घटनास्थळ गाठले. प्रहार संघटनेचे ऍम्ब्युलन्स चालक प्रशांत थोटे यांच्याशी लगेच संपर्क करून ऍम्ब्युलन्स मागवण्यात आली. व सदर घटनेची माहिती पोलीस स्टेशन मंगरूळ दस्तगीर चे ठाणेदार गौतम इंगळे यांना दिली. तसेच जखमी युवकाच्या मोबाईल वरून घरच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यामुळे नातेवाईक सुद्धा तातडीने घटनास्थळी येऊन युवकाला धामणगाव रेल्वे रुग्णालयात घेऊन गेले. यावेळी घटनास्थळी मंगरूळ दस्त पोलीस दाखल झाले असून पंचनामा करून पुढील तपास करत आहे.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!