शेती विषयक

विठूल येथे सेंद्रिय शेती बद्दल मार्गदर्शन

प्रतिनिधी – शशांक चौधरी 

सेंद्रिय शेती काळाची गरज असून शेतकरी बांधवांनी सेंद्रिय शेती करणे गरजेचे आहे या अनुषंगाने विडुल ता. उमरखेड जिल्हा. यवतमाळ येथे नवभारत फर्टीलायझर्स लिमिटेड तर्फे कंपनीचे अधिकारी विवेक जाधव, व कंपनीचे प्रतिनिधी यांनी उपस्थितीत गावातील शेतकरी यांना मार्गदर्शन केले. पिकाच्या आवश्यकतेनुसार आपण सर्व घटक पिकांना देणे गरजेचे असून त्या शेतकरी ठराविक खताचा वापर करीत आहेत त्यामुळे जमिनीची सुपीकता खालावत आहे त्यासाठी शेणखत व इतर सेंद्रिय खतांचा वापर करावा फवारणी करताना सुद्धा अति विषारी किटकनाशक फवारणी करीत आहेत याचा वापर कमी करावा असे यावेळी कंपनीचे अधिकारी यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी त्यांनी जैविक औषधांचे प्रात्यक्षिक केले व शेतकऱ्यांना जैविक सेंद्रिय शेती करावी असे मार्गदर्शन केले यावेळी गावातील शेतकरी पंजाबराव भालेराव, शेख आयुब चांद, सुभाष राणे व गंगाराम कुनभे व समस्त गावकरी मंडळी यांची यावेळी उपस्थिती होती.

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Welcome Post Advertisemnt

Advertisement

error: Content is protected !!