कासारखेड येथे शेतातील प्रत्यक्ष पिकांची पाहणी ; शेतकऱ्यांना मोठा आधार
धामणगाव रेल्वे
कमी पाऊस आणि दुष्काळी परिस्थितीमुळे बळीराजा संकटात सापडला असताना, उत्तम तंत्रज्ञान आणि दर्जेदार वाणांमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे. रेणुका ऍग्रो सर्विसेस (धामणगाव रेल्वे) यांच्या सौजन्याने आणि श्रीकर ग्रुप ऑफ कंपनीज (श्रीकर सीड्स) द्वारे आयोजित बीटी कॉटन ‘गरुडा ९९’ आणि ‘जय हो’ या वाणांचा भव्य पीक पाहणी व शेती व्यवस्थापन कार्यक्रम कासारखेड येथे उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सन्माननीय मल्लिका अर्जुन लिंगा यांनी भूषवले. पंचक्रोशीतील शेतकऱ्यांची मोठी उपस्थिती हा पीक पाहणी कार्यक्रम हितेश गोरीया आणि सतीश गोविंदराव शेलोकार या प्रयोगशील शेतकऱ्यांच्या शेतात आयोजित करण्यात आला होता. या पाहणीसाठी कासारखेड, वाघोली, हिंगणगाव, आणि तडणी या आसपासच्या गावांतील अनेक शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.















Add Comment