धामणगाव रेल्वे

शेवटी…. गावकऱ्यांच्या एकजुटीचा विजय ! अंकिता इंगळे ची रोजगार सेवकपदी नियुक्ती

ग्रा. प. जळका पटाचे रोजगार सेवक नियुक्ती प्रकरण ; तिसरी आमसभा ठरली निर्णायक

धामणगाव रेल्वे 

ग्रा. प. जळका पटाचे येथील रोजगार सेवक नियुक्ती प्रकरण तालुक्यासह जिल्ह्यामध्ये चर्चेचा विषय बनला असताना दि. ९ मार्च रोजी झालेल्या तिसऱ्या ग्रामसभेत निवडणुकीच्या माध्यमातून अखेर अंकिता उमेश इंगळे ही रोजगार सेवक पदाची मानकरी ठरली. १७६ मत मिळवत अंकिताने या नियुक्तीवर शिक्कामोर्तब केलेले आहे. तर दुसरा उमेदवार संगम अशोक राऊत याला १०९ मते मिळाले आहे. हा विजय केवळ अंकिताचा नसून सरपंचाविरोधात गावकऱ्यांच्या एकजुटीचा विजय असल्याचे बोलल्या जात आहे. त्यामुळे नागरिकांच्या वतीने नवनियुक्त रोजगार सेवकाचा गुलाल उडवीत मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा करण्यात आला आहे. दरम्यान पोलीस बंदोबस्तात ही तिसरी ग्रामसभा निर्णायक ठरली आहे. आता तुम्ही म्हणाल रोजगार सेवक पदासाठी तीन तीन ग्रामसभा आणि पोलीस बंदोबस्त कशासाठी? तर हो ग्रा. प. जळका पटाच्या रोजगार सेवकाच्या पदासाठी तब्बल तीन ग्रामसभा आणि पोलीस बंदोबस्त मागविणात आला होता.

गावकऱ्यांनी हाणून पाडला सरपंचाचा डाव ?

यापूर्वी पदावर असलेल्या रोजगार सेवकाचा मृत्यू झाल्यामुळे पद रिक्त झाले होते. दरम्यान त्या बदल्यात त्यांच्या पत्नीला रोजगार पद देण्यात यावे असे गावकऱ्यांचे म्हणणे होते. मात्र मिळालेल्या खास सूत्रांकडून सरपंचाला ते पद आपल्या घरी म्हणजे भावाला मिळवून द्यायचे होते. त्यासाठी २६ जानेवारी रोजी झालेल्या पहिल्या ग्रामसभेत मोठा गोंधळ उडाल्याने चक्क एका महिलेने सरपंचावर चप्पल भिरकावल्याने महिलेसह त्याच्या कुटुंबावर सरपंचाच्या तक्रारीनुसार तळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून जणू गावात महाभारत असल्याचे वातावरण तयार झाले होते. दरम्यान सरपंचाने नागरिकांची सहानुभूती मिळवण्यासाठी आपण सर्व मिळून त्या मृतक व्यक्तीच्या पत्नीला रोजगार सेवक पदी नियुक्त करू म्हटले मात्र शासनाच्या अति शर्तीमध्ये ते बसत नसल्याचे वरिष्ठाचे पत्र दाखविले. त्यामुळे शिक्षणाच्या अटीवर अनेक उमेदवारांनी अर्ज सादर करून निवडणूक लढवायची ठरवली असताना १३ उमेदवारांनी अर्ज सादर केले. मात्र दुसऱ्या ग्रामसभेमधे सुद्धा सरपंचानी आपल्या जवळच्या लोकांनाच बोलावल्याने गावातील नागरिकांनी दुसरी ग्रामसभा सुद्धा हाणून पाडली होती..

१३ उमेदवारांपैकी २ व्यक्तीच्या नावानेच ठरली निर्णायक लढत

शेवटी तिसऱ्या आणि निर्णायक ग्रामसभेमधे १३ उमेदवाराचे अर्ज असताना सरपंचाचा वतीने असलेल्या त्यांचा भाऊ संगम अशोक राऊत आणि गावकऱ्यांच्या बाजूने असलेली अंकिता उमेश इंगळे या दोघांमध्येच निर्णायक लढत सुरु झाली. आता दोन ग्रामसभा विवादित ठरल्या असताना ही ग्रामसभा तरी शांततेत कशी पार पडणार तर या मध्ये सुद्धा सरपंचाने फक्त ११ वाजतापासून १२ वाजेपर्यंत जे नागरिक ग्रा. प. च्या प्रांगणात असेल त्यांचेच मत घेतल्या जातील अन्यथा नाही ही घोषणा केल्याने गावातील नागरिकांनी त्याचा विरोध करीत संबंधित विस्तार अधिकारी आणि ग्रामविकास अधिकारी याना दुपारी १ पर्यंत नागरिकांचे मत घेण्यास भाग पाडले. दरम्यान १ वाजेपर्यंत एकूण ३५२ लोकांनी मतदान केले असता अंकिता इंगळे हिला १७६ तर संगम राऊत याला १०९ मत मिळाले. त्यामुळे सरपंच विरोधात नागरिकांनी अंकिता इंगळे ला निवळून आणल्याचे मत नागरिकांनी मांडले. आणि निवडणूक संपताच मोठा जल्लोष सुरु झाला. यावेळी पोलीस बंदोबस्तासह पंचायत समिती विस्तार अधिकारी निलेश वाघ, ग्रामविकास अधिकारी प्रज्वल भुयार यांच्या देखरेखेमध्ये हे निवडणूक प्रक्रिया पार पाडली.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!