दैनिक कळंब नगरी अमरावती जिल्हा ब्यूरो चीफ शशांक चौधरी यांची तालुका सहसचिव पदी नियुक्ती
धामणगाव रेल्वे:-
ग्रामीण पत्रकारांसाठी सदैव कार्यरत असलेली व ग्रामीण पत्रकारांच्या समस्यांची जाण असलेल्या अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेची धामणगाव रेल्वे तालुक्याची कार्यकारणी केंद्रीय अध्यक्ष मनोहर सुने यांच्या आदेशान्वये कार्यकारी अध्यक्ष युसुफ भाई यांच्या सूचनेनुसार जिल्हाध्यक्ष उमेश भुजाडणे यांनी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटना तालुका धामणगाव रेल्वेची कार्यकारणी आज घोषित केली.

यामध्ये तालुका अध्यक्ष म्हणून दैनिक लोकमतचे पत्रकार मिलिंद कुलकर्णी यांची निवड करण्यात आली. त्याचबरोबर धामणगाव रेल्वे तालुक्यातील कावली येथील दैनिक लोकमतचे गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत असलेले नितीन टाले यांची तालुका कार्याध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. त्याचबरोबर तालुका उपाध्यक्ष म्हणून निलेश चवरे, तालुका सचिव प्रशांत नाईक, तालुका सहसचिव शशांक चौधरी, तालुका संघटक बाबाराव इंगोले, तालुका सहसचिव मुन्ना गुप्ता, तालुका संपर्कप्रमुख डॉ. राहुल चौधरी, तालुका कोषाध्यक्ष निलेश रामगावकर, दैनिक लोकमत तळेगाव, तसेच धामणगाव रेल्वे अध्यक्षपदी शेख हाफिज यांची निवड करण्यात आली. तालुक्यात पत्रकारांच्या समस्या सोडवणे. पत्रकारांवर होत असलेल्या हल्ल्या विरोधात काम करणे. हा संघटनेचा मुख्य उद्देश असून संघटनेच्या ध्येय धोरणाला अनुसरून पत्रकारांनी काम करावे असे मत ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष उमेश भुजाडणे यांनी व्यक्त केले.













Add Comment