क्राईम धामणगाव रेल्वे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो मॉर्फ करून खाली अश्लील मजकूर टाकत व्हाट्सअँप स्टेटस ला ठेवले – युवकाविरोधात गुन्हा दाखल

तळेगाव दशासर पोलीस स्टेशन हद्दीतील घटना

धामणगाव रेल्वे

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो एडिट करून त्याखाली अश्लील मजकूर टाकत तो व्हाट्सअँप स्टेटस ला ठेवून महामानवाचा अवमान केल्याची घटना दि. ८ मे रोजी तळेगाव दशासर परिसरात घडली आहे. त्यामुळे अनेक समाज बांधवाच्या धार्मिक भावना दुखावल्याने आरोपीवर तात्काळ कारवाई करण्याबाबत समाजबांधव तळेगाव द. पोलीस स्टेशन वर धडकले असून ठाणेदार यांच्या सदरचा प्रकार निदर्शनास आणून दिला. करिता ठाणेदार रामेश्वर धोंडगे यांनी सुद्धा प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता तातडीने आरोपी मारोती वसंत काटकर विरोधात गुन्हा नोंद करून कायदेशीर कारवाई ला सुरुवात केली आहे.
सविस्तर असे कि, वार्ड क्र. ६ तळेगाव दशासर येथील युवक मारोती वसंत काटकर याने दि. ८ मे रोजी रात्री ८ वाजता च्या दरम्यान आपल्या व्हाट्सअँप स्टेटस ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो एडिट करून कार्टून वर लावत त्याखाली अशील मजकूर टाकत भीमशक्ती ग्रुप वर व्हिडिओ टाकला. त्यामुळे अनेक समाजबांधवाच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याने त्यावर कारवाई करण्याकरिता समाजबांधव रात्रीच तळेगाव पोलीस स्टेशनवर धडकले व त्याबाबत रीतसर तक्रार दाखल केली. त्या अनुषंगाने आरोपी मारोती वसंत काटकर याच्यावर दि. ९ मे च्या मध्यरात्री २ ते २ :२० च्या दरम्यान बी एन एस एस २९९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून तपासात घेतला आहे.

सदरच्या प्रकरणात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून कायदेशीर कारवाई सुरु आहे. 
रामेश्वर धोंडगे, ठाणेदार तळेगाव दशासर

मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!