धामणगाव रेल्वे शासकीय

जिल्हा भूमी अधीक्षक महेशकुमार शिंदे यांनी सोडविल्या नाकरिकांच्या तात्काळ समस्या

जनता दरबारात २५ तक्रारींचे तात्काळ निवारण

धामणगाव रेल्वे 

दि. ६ फेब्रुवारी रोजी भूमी अभिलेख कार्यालयातील आयोजित जनता दरबारात जिल्हा भूमी अभिलेख अधीक्षक महेशकुमार शिंदे यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्या तक्रारींचे तात्काळ निराकरण केले आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना दीर्घकाळापासून असलेल्या समस्यांपासून मुक्तता मिळाली आहे. अमरावती जिल्हयाचे पालकमंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतुन वरिष्ठ अधिकाऱ्यानी तालुकास्तरावर स्वतः हजर राहून प्रलंबित समस्यांचे निराकरण करण्याबाबत सूचना निर्गमित केल्या होत्या. त्या निम्मिताने जिल्हा भूमी अधीक्षक महेशकुमार शिंदे यांच्या आदेशावरून ६ फेब्रुवारी रोजी उप अधीक्षक भुमी अभिलेख धामणगांव रेल्वे कार्यालयात जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते.

महेशकुमार शिंदे यांचे स्वागत करताना शेतकरी बंधू तसेच कर्मचारी वर्ग 

सर्वप्रथम जनता दरबाराला मुख्य उपस्थिती म्हणून अमरावती जिल्हा भूमी अधीक्षक महेशकुमार शिंदे यांचे किशोर सानप उप अधीक्षक भूमी अभिलेख तसेच उपस्थित नागरिकांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले, त्यानंतर उपस्थित नागरिकांच्या महेशकुमार शिंदे यांनी समस्या जाणून घेत तब्बल २५ तक्रारींचे जाग्यावरच निराकरण करून जनतेला न्याय मिळवून दिला. यावेळी शेतकरी वर्ग आदित्य भोगे, रवींद्र ठाकरे, नंदू ढोले सह किशोर सानप उप अधीक्षक भूमी अभिलेख, अरविंद कावलकर शिरस्तेदार, एकनाथ मोकाशे नगरपरिरक्षण, भुमापक प्रशांत पाटील सतीश रामटेके, उमेश बढीये, पंकज देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते. त्यानंतर किशोर सानप यांनी उपस्थित मान्यवर व शेतकरी वारंगाचे आभार मानून जनतादरबाराची सांगता करण्यात आली.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!