धामणगाव रेल्वे

धामणगावातुन पहिला आय. ए. एस. अधिकारी असल्याचा बहुमान रजत श्रीराम पत्रे ला

शहरात आगमन होताच भव्य मिरवणूकसह सत्कार सोहळ्याचे आयोजन ; आमदार प्रताप अडसड यांची उपस्थिती

धामणगाव रेल्वे प्रतिनिधी

नुकत्याच निकाल लागलेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ३०५ वी रँक संपादित करून धामणगावातुन पहिला आय. ए. एस. अधिकारी असल्याचा बहुमान रजत श्रीराम पत्रे यांनी मिळवला असून आपल्या कुटुंबाचाच नव्हे तर संपूर्ण धामणगाव रेल्वे तालुक्याचे नाव गौरवणीत केले आहे. मेहनत जिद्द चिकाटी उराशी बाळगून रजत पत्रे यांनी आय. ए. एस. पदाला गवसणी घातली आहे. त्यामुळे सगळीकडून कौतुकाचा वर्षाव त्यांच्यावर होत आहे.
दि. २७ एप्रिल रोजी दिल्लीवरून धामणगाव शहरात आगमन झाले असताना रजत यांच्या स्वागतासाठी अनेक नागरिकांनी आपली हजेरी लावली. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून ते त्यांच्या निवासस्थानापर्यंत भव्य अशी मिरवणकु काढण्यात आली असताना ठिकठिकाणी रजतचे पुष्पगुछ व हार अर्पण करून त्याचे स्वागत केले. तसेच ढोल ताश्याचा गजरात नागरिकांनी नाचत गाजत मिरवणुकीत सहभाग घेतला.

सत्कार सोहळ्याला आमदार प्रताप अडसड यांची उपस्थिती

आय. ए. एस. अधिकारी रजत पत्रे यांचे धामणगावात आगमन झाले असताना आय. ए. एस. स्वागत समिती च्या वतीने मिरवणूक आणि सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, सदरच्या कार्यक्रमाला धामणगाव मतदार संघाचे आमदार प्रताप अडसड यांनी उपस्थिती दर्शवून रजत पत्रे यांच्या पुष्पगुछ देऊन सत्कार केला. तसेच आपल्या धामणगाव रेल्वे मतदार संघाचा अभिमान रजत श्रीराम पत्रे यांचे मनस्वी अभिनंदन करीत रजत सोबत रजतच्या आई-वडिलांचा त्याग, समर्पण, इच्छाशक्ती, जिद्द आज रजतच्या यशातील महत्त्वाचे कारण असल्याचे आमदार प्रताप अडसड यांनी म्हटले.
तसेच रजत श्रीराम पत्रे याचा आदर्श समोर ठेवत आपल्या मतदारसंघातून अनेक विद्यार्थी घडो हा संकल्प या क्षणी इथे असलेल्या प्रत्येक पालकांनी विद्यार्थ्यांनी घेतला तर नवा आदर्श घडेल असे प्रतिपादन सुद्धा आमदार प्रताप अडसड यांनी बोलण्यातून व्यक्त केले. यावेळी असंख्य नागरिक आय. ए. एस. अधिकारी रजत पत्रे च्या सत्कार सोहळ्याला उपस्थित होते.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!