धामणगाव रेल्वे प्रशासन

धामणगावात पेट्रोलची कोणतीही टंचाई नाही, अफवावर विश्वास ठेवू नये – तहसीलदार अभय घोरपडे

आपल्या टीम सह १२ पेट्रोल पंपांवर जाऊन घेतला परिस्थितीचा आढावा

धामणगाव रेल्वे 

इतर देशात सुरु असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर आपल्याकडे सुद्धा युद्धाचे परिणाम जाणवत असून तसेच नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण होत असल्याने पेट्रोल पंपावर तसेच गॅस एजन्सीकडे मोठ्या प्रमाणात नागरिक गर्दी करताना दिसत आहे. पेट्रोल सह गॅस चा तुटवडा होईल या धाकाने अनावश्यक पेट्रोल तसेच गॅस चा साठा काहि नागरिकांकडून जमा करण्यासाठी मोठ्या रांगा याठिकाणी दिसत आहे. मात्र संपूर्ण धामणगाव तालुक्यात कुठेही पेट्रोल तसेच गॅस ची टंचाई नसल्याचे तहसीलदार अभय घोरपडे यांनी स्पष्ट केले आहे.
तालुक्याच्या परिसरात एकूण १२ पेट्रोल पंप कार्यरत असून सर्व पंपांवर पेट्रोलचा पुरवठा नियमित व सुरळीत सुरू असल्याचा आढावा तहसीलदार अभय घोरपडे यांनी आपल्या टीम सह प्रत्यक्षात जागेवर जाऊन घेतला आहे. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवून पेट्रोल पंपावर गर्दी केल्यास कृत्रिम टंचाई निर्माण होईल. त्याकरिता नागरिकांना आवाहन करताना त्यांनी सांगितले की कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी करू नये. पेट्रोल मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. तसेच शहरामध्ये दररोज घरगुती वापरासाठी सुमारे ४०० गॅस सिलिंडरचे नियमित वाटप करण्यात येत असून नागरिकांना कोणतीही अडचण भासत नाही. प्रशासन संपूर्ण पुरवठा व्यवस्थेवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

काळाबाजार करणाऱ्यावर कारवाईचे कडक निर्देश

तहसीलदार अभय घोरपडे यांनी स्वतः तहसील कार्यालयात गॅस विक्रेता एजन्सींना बोलावून गॅसचा पुरवठा योग्य पद्धतीने करावा व कोणत्याही प्रकारची काळाबाजार होणार नाही याबाबत स्पष्ट सूचना दिल्या. ग्रामीण भागातील गॅस पुरवठा सुरळीत राहील याची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या. तसेच तहसीलदार अभय घोरपडे, निवासी नायब तहसीलदार ऋतुराज पटोरकर व महसूल नायब तहसीलदार प्रफुल देशमुख यांनी तालुक्यातील विविध पेट्रोल पंपांना भेट देऊन पेट्रोल व डिझेल पुरवठ्याचा आढावा घेतला. कोणताही पंप अथवा खाजगी व्यक्तीने निर्धारित किमतीच्या पेक्षा जास्त किमतीने पेट्रोल/डीज़ल विक्री करू नये अथवा फौजदारी कारवाई करण्यात येईल अश्या सूचना दिल्या. तसेच कुणालाही कॅन किंवा बाटलीमध्ये पेट्रोल देण्यास निर्बंध असल्याचेही स्पष्ट केले. यासोबतच पेट्रोल किंवा घरगुती गॅस सिलिंडरची काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल.
पुरवठा व्यवस्था सुरळीत राहण्याकरिता, आवश्यकतेनुसारच पेट्रोल व गॅसचा वापर करण्याचे तसेच व संयम बाळगून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!