धामणगाव रेल्वे प्रशासन कार्यवाही

धामणगावात ग्राहक बनुन ज्वेलर्स दुकानातील दागीने लांबविणाऱ्या त्या ४ बुरखाधारी महिलांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण पोलिसांची कारवाई ; ७३ हजाराचा मुद्देमाल जप्त 

धामणगाव रेल्वे

धामणगावात ग्राहक बनून आलेल्या आपल्या हातचलाखीने दागिने लांबविणाऱ्या त्या ४ बुरखाधारी महिलांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले असून त्या चारही महिलांना स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्यावर कारवाई केली असून १) नाजमीन परवीन अजीजोद्दीन वय ४५ वर्ष, रा. जीरा बावडी, ईस्लाम चौक, खदान जि. अकोला, २) मेहरुनीसा अब्दुल शफी वय ६८ वर्ष, रा. गंगानगर नं. २, संकल्प कॉलनी, अकोला, ३) नसरिन परवीन मो. शकील वय ४९ वर्ष, रा. सोनटक्के प्लॉट, जुने शहर, अकोला, ४) रुकसाना परवीन शेख अजीज वय ३० वर्ष, रा. सोनटक्के प्लॉट, जुने शहर, अकोला असे ताब्यात घेण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत.
धामणगावात मागील महिन्यात ग्राहक बनून आलेल्या ४ बुरखाधारी महिलांनी प्रथम ज्वेलर्स दुकानातून ४ ग्रॅम सोन्याची अंगठी किंमत ४८६०० तर शारदा ज्वेलर्स दुकानातून १४० ग्रॅम वजनाचे चांदीचे पैंजण किंमत २५००० हातचलाखीने लांबविल्याची घटना घडली होती. दुकानदार महेश वर्मा यांच्या तक्रारीवरून दत्तापूर पोलिसांनी सदरचा गुन्हा दाखल करून तपासात घेतला होता.
त्याअनुषंगाने, स्थानिक गुन्हे शाखा, अमरावती ग्रामीण चांदुर रेल्वे उपविभागातील पथक हे दिनांक १३ डिसेंबर २५ रोजी पो.स्टे. दत्तापुर हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना गोपनिय बातमीदाराकडून खबर मिळाली की, प्रथम व शारदा ज्वेलर्स मध्ये दागीन्यांची फसवणुक अकोला येथील महिला मेहरुनीसा अब्दुल शफी व तीचे इतर साथीदारासह मिळुन केली असुन ती सध्या पुन्हा अशाच प्रकारचा गुन्हा करण्यासाठी धामणगाव रेल्वे स्टेशन आल्या आहेत. अशा माहितीवरुन स्था.गु.शा. चे पथकाने पो.स्टे. दत्तापुर येथील महिला पोलीस स्टॉपसह फसवणुक करणाऱ्या महिलांचा रेल्वे स्टेशन परिसरात शोध घेवून ताब्यात घेवून त्यांना महिला पोलीसांच्या मदतीने विश्वासात घेवून विचारपुस केली असता त्यांनी धामणगाव रेल्वे येथील प्रथम व शारदा ज्वेलर्स येथील दागीने चोरीची कबुली दिल्यावरुन सदर महिलांनकडुन गुन्हयात हातचलाखीने फसवणुक करुन घेवून गेलेले ४ ग्रॅमची सोन्याची अंगठी कि. ४८,६०० व चांदीचे पैजन अंदाजे १३८ ग्रॅम वजनाचे कि.अं. २४,९३० असा एकुण ७३,५३० चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त मुद्देमाल व महिला आरोपी पुढील कार्यवाही करीता पो.स्टे. दत्तापुर यांचे ताब्यात देण्यात आल्या आहेत.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक विशाल आनंद (भापोसे),  अपर पोलीस अधिक्षक पंकज कुमावत (भापोसे) यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक  किरण वानखडे यांचे नेतृत्वात  पो.उप.नि. मुलचंद भांबुरकर,  सोनाली राठोड, अमंलदार अमोल देशमुख, सुधीर बावणे, मंगेश लकडे, सचिन मसांगे, दिनेश कनोजीया, शिवा शिरसाठ पो.स्टे. सायबर, म.पो.कों पुनम मेश्राम व चालक हर्षद घुसे यांचे पथकाने केली आहे.
मुख्य संपादक : सुरज वानखडे

About the author

मुख्य संपादक : सुरज वानखडे

Add Comment

Click here to post a comment

Featured

Advertisement

Advertisement

error: Content is protected !!